पुण्य वार्ता
अकोले : निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.
सिद्धार्थ मोरे यांचे मार्गदर्शनाखाली अकोले येथे स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदार जनजागृती निमित्त सेल्फी पॉइंटचे अनावरण करण्यात आले. या निमित्त अकोल्यातील सुप्रसिध्द रील स्टार तसेच स्वीप अकोलेचे अम्बेसेडर कांचन चौधरी यांनी अकोले मतदार संघातील तमाम नागरिकांना २० नोव्हेंबर रोजी १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी इलेक्शन निवडणूक नायब तहसीलदार श्री. दत्ता वाघ, स्वीप नोडल अधिकारी कचरे मॅडम, मंडळ अधिकारी सुरेखा वाकचौरे, मनीषा ढगे, बागवान सर, तसेच स्वीप टीम अकोले उपस्थित होते. महाराष्ट्रासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक मिश्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमांच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी ‘मी मतदान करणार ‘ या घोषवाक्याचे वैशिष्ट्यपूर्ण सेल्फी प्रॉप्स त्यांना विशेष भावले. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम चांगले असून, शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नागरिकांशी संवाद साधणारे उपक्रम आयोजित करावेत, चांगले उपक्रम राबविणाऱ्यांना सन्मानित करावे, अशी सूचना त्यांनी केली. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचेही ते म्हणाले.
निवडणूक निर्णय अधिकारी २१६ अकोले (अ.ज.) विधानसभा मतदार संघ तथा उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) अहिल्यानगर

