पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
डाक विभाग संचार, मंत्रालय भारत सरकार द्वारा डिजिटल युगात पत्रलेखनाचा अनुठा आनंद या विषयावर राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा, महाराष्ट्र गोवा सर्कल का कार्यालय महाराष्ट्र गोवा मुख्य पोस्ट मास्टर जनरल कार्यालय मुंबई यांचे मार्फत ही स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेमध्ये आर्या कानवडे हिने सहभाग नोंदविला होता तर या स्पर्धेत तिचा महाराष्ट्र गोवा सर्कल मध्ये राज्यात तिसरा नंबर मिळाला.
महाराष्ट्र राज्य मुख्य पोस्ट मास्टर जनरल परिमंडल अमिताभ सिंह यांच्या हस्ते25/2/2025 रोजी मुंबई येथील मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय येथे, तिचा 5000 रुपये रोख व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमिताभ सिंग
पोस्ट मास्टर जनरल मुंबई, श्रीम, साक्षी भाटिया, सुचिता जोशी, पोस्ट मास्टर जनरल जयती समाधार फायनान्स व श्रीमती नलिनी मोहनदास हे अधिकारी उपस्थित होते.
आर्या कानवडे हिला मिळालेल्या यशाने महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर च्या मुख्याध्यापिका संध्या कांबळे, वर्ग शिक्षिका सौ गोर्डे ,आणि हिंदी शिक्षिका उषा चव्हाण, यांनी तिला खास मार्गदर्शन केले होते व त्यांनी आर्या कानवडे हिचे अभिनंदन देखील केले आहे खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी देखील अभिनंदन केले आहे त्याचबरोबर सचिन फापाळे, अमोल फापाळे ,स्वरा कानवडे ,किसन भोईटे बेलापूर यांनी तिचे खास अभिनंदन केले आहे.
