पुन्य वार्ता
विरगाव (ज्ञानेश्वर खुळे)-
आढळा धरणावर काल दिनांक 10 डिसेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरुन नेले. आढळा धरण हे आठमाही धरण आहे. या धरणातून आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात पाट पाण्याद्वारे शेतीला पाणीपुरवठा केला जातो. ज्या शेतकऱ्यांना पाट पाणी पोहोचत नाही त्यांनी रितसर परवानगी घेऊन धरणातून स्वखर्चाने पाईपलाईन करून शेतीला पाणीपुरवठा केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून धरणातून शेतीला पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो.
शेतीलाईट चे वेळापत्रक सहा ते आठ तासांचे आहे. त्यामुळे पाणीटंचाई, पाईपलाईन फुटणे ,पाणीपट्टी, पाईप लाईन फुटणे इत्यादी अनेक घटनांनी शेतकरी आधीच मेटाकुटीला आले आहेत.
काल रात्री अज्ञात चोरट्यांनी देवठाण धरणावर असलेल्या तीन कृषी पंप चोरुन नेले. त्यात वीरगाव चे शेतकरी अण्णासाहेब थोरात यांची 7.5 एच पी टेक्समो कंपनीची, नामदेव नाना कुमकर यांची पाण्यातली व टोचन असलेली टेक्समो कंपनीच्या अनुक्रमे 5 एचपी व 7.5 एचपी टेक्समो कंपनीच्या तसेच विठ्ठल श्रीपत कुमकर यांची 400 फूट केबल ची चोरी झाली.तसेच देवठाण चे शेतकरी शिवाजी लक्ष्मण बोडके यांची साडेसात एचपी टेक्समो कंपनी व उत्तम माधव बोडके साडेसात एचपी टेक्समो कंपनी ची मोटर ज्या ठिकाणी बसवली होती त्या ठिकाणापासून अंदाजे शंभर ते दीडशे फूट अंतरावर आढळली.
अकोले पोलीस स्टेशनचे मा. घुले साहेब यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पंचनामा केला.
आज्ञत चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी केली आहे..

