पुन्य वार्ता
मुख्य संपादक
आज संपूर्ण जिल्हाभर एका नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपा वर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्याच नाव मुखोद्गत झाले आहे. असे व्यक्तिमत्व म्हणजे नितीनभाऊ दिनकर. त्यांच्या नावातच सूर्य असल्यामुळे ते आज सूर्याच्या भूमिकेतून संपूर्ण जिल्ह्यात एक अनोखा प्रकाश टाकत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेणारा हा लेख.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वराच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या नेवासा नगरीत अतिशय गरीब दलित कुटुंबात जन्म घेऊन आयुष्यात अविरत संघर्ष करून यशोशिखर गाठलेल्या या व्यक्तिमत्वाचा आदर्श घेण्यासारखाच आहे. खर म्हटलं तर नितीन दिनकर हा ऐकण्याचा, वाचनाचा, वा लिहण्याची विषय नसून खऱ्या अर्थाने हा अनुभवण्याचा विषय आहे. दिनकर यांचा राजकीय जीवनप्रवास अतिशय थक्क करणारा आहे. बजरंग दल आणि संघ परिवार यात हिरीरीने सहभाग घेणारा तो हिंदू युवक अनेक वर्षांपासून आपले हिंदुधर्मप्रेम जगासमोर छाती ठोकून सांगत आहे, त्यांच्या अंगातील राजकीय उर्जा त्यांना स्वस्थ बसू देत नाही म्हणून जिल्हाभर दौरे करून सामान्य युवकांच्या घरोघरी जाऊन युवकांची मोठी चळवळ उभी केली. अविरतपणे समाजाची सेवा करणे, सामान्य जनतेची कामे करणे यामुळे नितीन दिनकर नावच वादळ राजकारणात उभारी घेऊ लागले. यामागे त्यांची असणारी मेहनत खूप आहे. सामान्य कार्यकर्ता ते भाजपचे जिल्हा कार्याध्यक्ष, प्रदेश प्रवक्ता हा प्रवास त्यांना सहजरीत्या मिळाला नाही.
नितीन दिनकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे हे वारंवार त्यांच्या कार्यातून सिद्ध होत. त्यांना कोणत्याही प्रमाणाची गरज नाही.. आपल्या पाठीमागे असणारी पक्षाची एकनिष्ठता सांभाळणारे हे एकमेव व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. हा आदर्श तरुणांनी कायम डोळ्यापुढे ठेऊन मार्गक्रमण केले पाहिजे दिनकर हे खऱ्या अर्थाने तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत.
राजकारणात भले भले आले आणि गेले मात्र तोच टिकतो जाच्याकडे पक्ष आणि एकनिष्ठपणा अंगी असतो असेच एक उमलते नेतृत्व जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपल्या पक्षाच्या एकनिष्ठ कामातून उदयास येत आहे.
एकनिष्ठता शिकवी तर नितीन दिनकर यांचे कडूनच, पक्षाने लोकसभा निवडणूक प्रमुख केले. शिर्डी लोकसभा लढावयाची असाच तो संदेश होता. त्यांनी तयारी केली मात्र जागा वाटपात मित्रपक्षाला गेली. तरी प्रामाणिक पणे काम केले. पक्षाने श्रीरामपूर विधानसभा प्रमुख केले म्हणजे विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. त्यांनी आपले बिऱ्हाड श्रीरामपूर हलवले, परंतु तिकिट मिळाले नाही. नेवासा विधानसभा मतदार संघात प्रचाराची मोहीम हाती घेत विठ्ठलरावं लंघे यांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली.
पक्षासाठी दिलेली साथ फलदायी ठरल्याने राजकीय वाटचालीला कलाटणी देणारी ठरली. चमकणारा हिरा जास्त दिवस दुर्लक्षित राहू शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या हिऱ्याची पारख केली आणि नगर जिल्हा भाजपा संघटन वाढवण्याची एक प्रकारे जबाबदारी दिली अस म्हंटल तर आज वावग ठरणार नाही. नामदार राधाकृष्ण विखे यांच्या पाठबळावर भाजपा च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदावर विराजमान होता आलं व काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
तसा नितीन दिनकर यांना जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. सरळ मार्गाने चालत असताना ज्यांच्या वाट्याला सदैव टोकाचा व निकाराचा संघर्ष राजकारणात आला राजकारणात प्रवेश करतानाच दिगग्ज राजकारण्याबरोबर त्यांना अपयशाची तमा न बाळगता तालुक्याच्या अस्मितेसाठी लढाई करावी लागली संघर्ष जणु काय ज्यांना नित्याचीच बाब होय असे संघर्षशील व्यक्तिमत्व व संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे नितीन दिनकर हे होय .राजकीय क्षेत्रात दिनकर यांच्या आयुष्यात संकटे आली पण पराभवाने खचून न जाता त्यांनी गेली अनेक वर्ष शेतकरी, कष्टकरी, कामगार या सर्वांसाठी संघर्ष केला आंदोलने ही केले. प्रसंगी तालुक्यातील शेतकरी दूध आंदोलनात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. तालुक्यातील विविध रस्तारोको करत असतांना त्यांच्यावर गुन्हे ही दाखल झाले काही पडत्या काळात पोलिसांनी देखील दबंगगिरी केली त्याने विचलित न होता समाजकार्य सुरू ठेवले.
परंतु अपार मेहनत घेतली आहे आज जरी सामान्यातला सामान्य माणूस जरी त्यांच्याकडे गेला तर त्याला ते नावानिशी ओळखतात .. त्या व्यक्तीला ते नावाने हक मारतात ... तेही हक्काने आणि आयुष्यभर तो व्यक्ती नितीनभाऊंचा होतो हि कला त्यांनी अवगत केली.या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करणार हे व्यक्तिमत्व आज भाजपचे जिल्ह्यातील नेते म्हणून काम करत असतानाच आपली मायभूमी नेवासा याकडे सुद्धा दुर्लक्ष केले नाही हे त्यांच्या कामावरून दिसून येते. भाजप आमदारांना निवडून आणण्यासाठी ते शूर सेनापतीसारखे दिवसरात्र लढले आणि ते त्यात यशस्वी झाले,आपल्या शहराचा विकास व्हावा यासाठी ते नगरपंचायतीची निवडणूक देखील लढले, परंतु दुर्दैवाने ते त्यात अयशस्वी ठरले,कारण या निवडणुकीत सर्वजण एकत्र येऊन त्यांच्या पराभवासाठी झटत होते,परंतु हार मानेल तो दिनकर कसा? ते पुन्हा अंगाची धूळ झटकून उठले,आणि पक्ष विस्ताराकडे लक्ष केंद्रित केले,आणि पक्षाने या कर्तृत्ववान नेत्याची दखल घेत शिर्डी लोकसभा विस्ताराचे काम सोपवले,तो कालही थांबला नव्हता आजही थांबला नाही,तो लढतच राहिला,लढतच आहे...
त्यांच्या राजकारणाकडे पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात, ब्रम्हलीन श्री श्री 1008 बाल ब्रह्मचारी जी महाराज यांचा सहवास त्यांनचे जीवन बदलावणारा ठरला. देवगड संस्थान चे भास्कर गिरी महाराज यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. चळवळी तुन उभारणीस आलेला हा कार्यकर्ता आज नेहमी चर्चेचा विषय बनलेला आहे. त्यांच बोलन, वागण आणि राहणीमान अस्सल गावरान आहे एखाद्या नवीन व्यक्तीने त्यांना बघितल्यावर त्याला त्यांची भुरळ पडते बोलतांना अतिशय साधीसरळ भाषा शैली लोकांना समजेल अशी भाषा ,फोनवर बोलतांना वापरलेली कडक दमदार भाषा.. आपलेपणा त्यांनी सर्वच ठिकाणी निर्माण केला आहे.अतिशय मेहनती असलेला हा शिर्डी लोकसभेसाठी भाजपचा प्रमुख दावेदार ठरला होता, चळवळीतून उभारणीस आलेला हा दमदार नेता भविष्यात अनेक यशोशिखर गाठू शकेल यात शंका नाही, अशा या सर्वगुणसंपन्न ,अष्टपैलू ,आणि राजकारणातला सूर्य असलेल्या नेत्याचा आज वाढदिवस,त्यांना हार्दिक शुभेच्छा वा येणाऱ्या काळात त्यांच्या हातून असेच कार्य आणि समाजसेवा घडून त्यांची उतरोतर प्रगती होवो हीच सदिच्छा....!
शब्द संकलन :-
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक, भाजपा सोशल मीडिया सेल, उत्तर नगर

