पुन्य वार्ता
लिंगदेव (प्रतिनिधी ) :- "करी शिक्षण जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे!" या ब्रीद वाक्याने प्रेरित झालेल्या साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड संचलित.. श्री लिंगेश्वर हायस्कूल व आर आर कानवडे ज्युनिअर कॉलेज लिंगदेव आणि लाल बहादुर शास्त्री विद्यार्थी वसतिगृह लिंगदेव प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीणजी जोशी सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते, लेखक प्रा.श्री. प्रदीपजी कदम सर, तसेच मैत्रेय ट्रॅव्हल्सचे संचालक व प्रसिद्ध उद्योजक श्री. भाऊसाहेबजी घोमल उपस्थित होते. प्रमुख अतिथी संस्था ऑडिटर श्री.अशोकजी गवारे सर, के. एन.केला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आशिष कुटे सर, लिंगदेव गावचे विद्यमान सरपंच श्री. अमितजी घोमल, प्रशालेचे माजी प्राचार्य व संस्था शिक्षणाधिकारी श्री. डी. बी फापाळे सर, इमेज हॉलिडेजचे संचालक व कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी श्री. हरिभाऊ फापाळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस सरचिटणीस श्री.विकास वाकचौरे, प्रशालेचे सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक श्री.प.सा. चौधरी सर, माजी केंद्रप्रमुख व ज्ञानगंगा वाचनालयाचे अध्यक्ष श्री. सदाशिव कानवडे गुरुजी,पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. जालिंदरशेठ कानवडे, लहित प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सूर्यवंशी सर, इंजिनीयर श्री. अमोलजी फापाळे, लिंगदेव सोसायटीचे चेअरमन श्री.भाऊपाटील कानवडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. भाऊपाटील तळेकर,श्री. ज्ञानदेव ढोकरे, श्री. जिजाबा कानवडे उपस्थित होते. तसेच लिंगदेव -लहित पंचक्रोशीतील ग्रामस्थ,पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते, लेखक प्रा. श्री. प्रदीपजी कदम सर यांनी आपल्या मनोगतातून "प्रेरणा युवकांसाठी" या विषयावर बोलताना विद्यार्थी हे शाळेचे खरे वैभव आहे, विद्यार्थ्यांच्या अंगी भक्ती,ज्ञान,प्रेम, करुणा यांचा संगम असावा. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ध्येय प्राप्तीसाठी अविरत प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी आई-वडील, शाळा,समाज, पुस्तकं आणि निसर्ग यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. तसेच आपल्या ध्येयावरती प्रेम करावे, असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले. सूर्या करिअर अकॅडमीचे संचालक डॉ.श्री. बेनके सर यांनी संस्थेच्या, प्रशालेच्या, व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सौ.ज्योस्त्नाताई बेलवटे मॅडम, उद्योजक श्री. दिनेश जाधव व इतर बक्षिसदात्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे दिली.
अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीणजी जोशी सर यांनी ग्रामस्थ व पालक यांच्या मदतीने शाळेचा विकास अविरत सुरू आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय व कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रवीणजी जोशी सर यांनी गावाच्या सहकार्याने व संस्थेच्या मदतीने प्रशालेची नवीन इमारत बांधण्याचा संकल्प व्यक्त केला. ईशस्तवन व स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे विद्यमान प्राचार्य श्री.आर. पी.चौधरी सर यांनी , प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.श्रीमती. जयश्री शिंदे मॅडम, शालेय वार्षिक अहवाल वाचन शिक्षक प्रतिनिधी प्रा. श्री.अशोक मुरादे सर,सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा श्री.सतिष वाडेकर सर व श्रीमती. निर्मला लोहरे मॅडम यांनी तर, बक्षीस यादी वाचन प्रा.श्री राजेंद्र हासे सर व श्री नवनाथ उगले सर यांनी तर आभार प्रा.श्रीमती.लंका सिनारे मॅडम यांनी मानले, फलक लेखन कलाशिक्षक श्री. सुदाम कानवडे सर यांनी केले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संस्था पदाधिकारी, प्रशालेचे प्राचार्य. श्री. आर. पी.चौधरीसर इन्चार्ज प्रा.श्री. ए. बी मंडलिक सर,वसतिगृह अधिक्षक श्री. एस. व्ही. आंबरे सर , ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एन.वाकचौरे सर, सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षिकेतर कर्मचारी, लिंगदेव- लहित पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विद्यार्थी मित्रांचे सहकार्य लाभले.
हरिभाऊ फापाळे
९३७१८०६०८३


