पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी)रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या डिस्ट्रिक्ट डायरेक्टर पदी रोटरी क्लब अकोलेचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांची क्लब अडमिनिस्ट्रेशन च्या रिव्हेन्यू डिस्ट्रिक्ट चेअर,अहिल्यानगर पदी, डॉ. रवींद्र डावरे यांची लिटरसीच्या डिस्ट्रिक्ट असोसिएट डायरेक्टर(झोन – इ) पदी,सचीन आवारी यांची ह्युमन डेव्हलपमेंट च्या रिव्हेन्यू डिस्ट्रिक्ट चेअर,अहिल्यानगर पदी
तर सचिन शेटे यांची न्यू क्लब एक्सटेन्शनच्या
रिव्हेन्यू डिस्ट्रिक्ट चेअर,अहिल्यानगर पदी तर सचिन देशमुख यांची रोटरी क्लब ऍक्शन प्लॅन चॅम्पियन पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधिर लातुरे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या रोटरी क्लबची स्थापना अकोले येथे 2017 मध्ये करण्यात आली. सामाजिक बांधिलकी असणारे विविध क्षेत्रातील
तरुण यांचा रोटरी क्लब मध्ये समावेश आहे. रोटरी क्लबच्या स्थापनेपासून आज पावेतो सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल अग्रेसर राहिला आहे. रोटरी क्लबचे कार्य तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी हे सर्व विशेष परिश्रम घेत आहे
रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 मध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश आहे.
प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी रोटरी क्लब अकोलेच्या बुलेटिन एडिटर,उपाध्यक्ष, सेक्रेटरी व अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे.तर डॉ.रवींद्र डावरे यांनी सेक्रेटरी, अध्यक्ष व डिस्ट्रिक्ट डायरेक्टर पदी कार्य केलेले आहे.सचिन आवारी यांनी सेक्रेटरी, अध्यक्ष व डिस्ट्रिक्ट डायरेक्टर पद सांभाळलेले आहे,तर सचिन शेटे यांनी सेक्रेटरी व अध्यक्ष पदावर काम केलेले असून या सर्वांनी बोर्ड ऑफ डायरेक्टर ची विविध पदे सांभाळली आहेत. तर सचिन देशमुख यांनी रोटरी क्लब चे खजिनदार, सेक्रेटरी व अध्यक्ष पद सांभाळलेले आहे.
त्यांच्या या सर्वांची सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची डिस्ट्रिक्ट डायरेक्टर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीचे रोटरी क्लब अकोलेचे आजी ,माजी पदाधिकारी,सर्व सदस्य यांचेसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

