पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि,
9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा,,
( इयत्ता ५ वी ) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
(इयत्ता ८वी) परीक्षेचा निकाल दिनांक
२५/४/२०२५ रोजी घोषित झाला असून अंतीम गुणवत्ता यादी दिनांक
९/७/२०२५ रोजी घोषित करण्यात आलेली आहे.
त्यानुसार स्वरा मच्छिंद्रनाथ रासकर , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव आवारी याविद्यार्थिनीने २७८/३०० गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,,,,
1-धामणगाव आवारी १ विद्यार्थिनी राज्य गुणवत्ता यादीत
*१८ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले,,,
या शाळेने नेहमीप्रमाणे गुणवत्ता यादीत बाजी मारली आहे.
2- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्रुक ३
3- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळी रूम्हणवाडी २
या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे .
त्याचप्रमाणे
4- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समशेरपूर,
5- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडसरवाडी,
6- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव पाट,
7- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिं. निपाणी
8- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेफळ
या शाळांमधील प्रत्येकी १ विद्यार्थ्याने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील राज्य गुणवत्ता यादीत १ व जिल्हा गुणवत्ता यादीत २८ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे.
राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थ्यांना
श्री. विक्रम गायकर (धामणगाव आवारी),
श्रीम.स्वप्ना गुरव(कळसबु.),
श्री दीपक सुकटे
(केळी रुम्हणवाडी),
श्रीम.समता कराळे (समशेरपुर),
श्रीभगवान सहाणे(सा. पाट),
श्रीम. सुरेखा नेहे (घोडसरवाडी),
श्रीम. शारदा गीते (पिं. निपाणी)
श्री. सतीश जाधव (कुंभेफळ)
या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता ५वी) जिल्हा गुणवत्ता यादीत ३ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८वी) जिल्हा गुणवत्ता यादीत तालुक्यातील एकूण १५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून
1- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
2- शिंगणवाडी
3- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टिटवी
प्रत्येकी १ विद्यार्थिनीची
जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली असून त्यांना
श्री. संतोष घुले (शिंगणवाडी)
श्री, रामनाथ मुंढे (टिटवी) या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
तालुक्यातील विविध खाजगी अनुदानित शाळांमधील १३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या शाळांचे सर्वमुख्याध्यापक ,
पालक यांचे या यशात महत्त्वाचे योगदान असून सर्व केंद्रप्रमुख, सर्व विस्तार अधिकारी यांनी यासाठी वारंवार शाळा भेटीद्वारे
पाठपुरावा केला.
सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मा. किरणजी लहामटे, आमदार अकोले विधानसभा ,
मा. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर,
मा. भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी ( प्राथ.) अहिल्यानगर,
मा.श्रीम संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (माध्य.) अहिल्यानगर,
मा. श्री अमर माने, गटविकास अधिकारी, पंचायत समिती अकोले,
श्री. अरविंद कुमावत , गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती अकोले
श्री बाळासाहेब दोरगे, शिष्यवृत्ती परीक्षा समन्वयक ,अकोले
श्री माधव हासे
विस्तार अधिकारी ,
अकोले,समशेरपूर,
श्री झावरे एस एम
विस्तार अधिकारी,
शेंडी
श्री सुनिल नरसाळे,
श्री नवनाथ वनवे ,
श्री सुनील घुले,
श्री बाळू आरोटे,
श्री गोरख कुचेकर
सर्व केंद्र प्रमुख,
यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे
अभिनंदन केले आहे.

