पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
पंढरीची वारी आहे माझे घरी|
आणिक न करी तीर्थव्रत||
व्रत एकादशी करीन उपवासी|
गाईन अहर्नीशी मुखी नाम||
नाम विठोबाचे घेईन मी वाचे|
बीज कन्यांतीचे तुका म्हणे||
• संत तुकाराम
आषाढी एकादशीच्या निमित्ताने,,,
जि.प.प्राथ.शाळा,चितळवेढे ता अकोले,
या ठिकाणी दिनांक ६ जुलै २०२५ रोजी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सकाळपासूनचं विद्यार्थी वारकर्यांची लगबग सुरु होती.आज नेहमीपेक्षा जरा लवकरच ज्ञानसागरातील राजहंसरुपी वारकरी शाळेत येत होते.
विठ्ठल रुखमाईची वेशभूषा करून विद्यार्थी तयार होते.
विठ्ठल रुखमाईच्या पालखीची सजावट,मुलामुलींची वेशभूषा अप्रतिम करण्यात आली होती.मुलां मुलींनी वारकरी वेशभूषा केली होती.पालखीत विठ्ठल रुक्माईकीची मुर्ती दिमाखात उभी करण्यात आली होती.कपाळी गंध, गळ्यात टाळ,डोईवर तुळस आणि मुखाने हरीनामाचा गजर करत शाळेच्या प्रवेशद्वारापासुन दिंडीला सुरुवात झाली.
टाळ -मॄदूंगाचा गजर, दिंडीतील गावकरी ,पालकांचा सहभाग ,महिलांची लक्षणीय उपस्थिती अशा भक्तिमय वातावरणात सर्वजण भजनात तल्लीन होऊन नाचत ,भजन गात ,गावप्रदिक्षणा करत होते.
पायी दिंडी शेवटी गावातील विठ्ठल रुखमाईच्या मंदिरात दाखल झाली.
मोठ्यांसोबत बालवारकर्यांनी हरीपाठ,अभंग ,भजन म्हणत,शिक्षक, विद्यार्थी पालक,तरुण कार्यकर्ते फुगडी खेळत या सर्वांनी वातावरणात भक्तीचा मळाच फुलविला.
वरुणराजाची हजेरी, अल्हाददायक ,भक्तीमय आणि आनंदी वातावरण, अबालवृद्धांचा उस्फुर्त सहभाग,महिलांची उपस्थिती, मुख्याध्यापक,शिक्षक यांचे नेटकं नियोजन यामुळे प्रत्यक्ष चितळवेढे नगरीत जणू अवघी पंढरीच अवतरली होती.
अखेर विठू नामाचा जयघोष करत
दिंडीची सांगता करण्यात आली.

