पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुक्यात माजी मंञी मधुकरराव पिचड यांच्या साठी संपुर्ण तालुक्यात विविध मंदिरांमध्ये होमहवन व प्रार्थना चालु असतानाच मुस्लीम समाज ही आता पुढे आल्याच चिञ दिसुन येत आहे आज मुस्लिम समाज्याच्या वतीने अकोले येथे गौस पाक दर्गाह व राजूर येथिल चाँद शाहवली बाबा दर्गाह या ठिकाणी राजूर मधिल मुस्लिम समाजाच्या वतीने चादर चढवून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. मधुकररावजी पिचड साहेब हे लवकरात लवकर बरे व्हावे, या साठी प्रार्थना करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. तालुका अध्यक्ष सलिम शेख सर व जिल्हा उपाध्यक्ष नाजिम शेख यांच्या वतीने अकरा, अकरा हजार रुपये आगामी विधानसभेसाठी वैभवभाऊंना मदत देण्याचे जाहीर केले आहे.
याप्रसंगी सर्वानुमुते येत्या निवडणुकीत माजी आमदार वैभवराव पिचड यांचे मागे उभे राहण्याचा निर्धार यावेळेस करण्यात आला आहे तसेच निवडणुकीसाठी सार्वजनिक वर्गणी गोळा करून माजी आमदार वैभवराव पिचड यांना देण्याचे ठरले. यावेळी अल्पसंख्याक मोर्चा तालुका अध्यक्ष सलिम शेख, नगर जिल्हा उपाध्यक्ष नाजीम शेख, आरीफ शेख, नगरसेवक मोसीम शेख, सि.ए.आसिफ शेख,मोसिन शेख, सैफ अली शेख, शहेबाज शेख,नौशाद शेख, अरबाज शेख, शाकिब शेख,मैनुद्दिन शेख, समीर शेख, सांडु शेख, सलमान शेख, रिहान मणियार, अब्दुल सत्तार , इन्नुस शेख, नाजीम सय्यद, अरमान मनियार, समीर मनियार आदी सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.


