पुन्य वार्ता
अकोले तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आदिवासी विकास मंत्री वंदनीय मधुकरराव पिचड साहेब
यांना
गेल्या आठ दिवसापूर्वी म्हणजे १५ ऑक्टोबर ला रात्री उशिरा मुंबईवरून घरी परतल्यानंतर पहाटेच्या वेळी पिचड साहेबांना “ब्रेन स्ट्रोक” चा त्रास जाणवायला लागला. त्यानंतर पिचड साहेब यांना नाशिक येथील “नाईन पल्स” या हॉस्पिटल ला पुढील उपचारासाठी नेण्यात आले.
त्यानंतर डॉक्टरांनी गेल्या आठ दिवस खूप शर्तीचे प्रयत्न करून, साहेबांवर उपचार केले. साहेबांची तब्येत खूप चिंताजनक व स्थिर असताना ही, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. आणि ८४ वर्षांच्या पिचड साहेबांनी उपचारांना साथ दिली. आता
वंदनीय मधुकरराव पिचड साहेब यांची प्रकृती व्यवस्थित आहे.
वंदनीय मधुकरराव पिचड साहेब लवकरात लवकर या आजारातून बरे व्हावे आणि पुन्हा अकोले तालुक्याच्या जनतेच्या सेवेत दाखल व्हावे.
ही सर्व अकोलेकरांची पिचड साहेबांच्या हितचिंतकांची तसेच कार्यकर्त्यांची प्रार्थना आहे.
यासाठी आपणा सर्वांनी उद्या
🔸बुधवार दि.२३/१०/२०२४ रोजी सायंकाळी ठिक ७:०० वाजता
जगदंबा (संटुआई) माता मंदिर, पिंपळगाव निपाणी या ठिकाणी पिचड साहेबांच्या निरोगी दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी “महाआरती” चे नियोजन केले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती…
🔹 आयोजक: समस्त ग्रामस्थ पिंपळगाव निपाणी आणि हितचिंतक पंचक्रोशी

