पुण्य वार्ता
एकदरे/प्रतिनिधी (बाजीराव भांगरे)-
अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इदेवाडी ,चंदगीरवाडी येथे महादेव कोळी मित्र मंडळ परिवहन बृहमुंबई महानगरपालिका परिवहन यांच्याकडून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.त्यामध्ये 200 पेजेस लॉग बुक,200 वह्या,प्लास्टिक कंपास व कीट,जॉमेट्री बॉक्स,पेन,दोन स्टील वॉटर फिल्टर.अश्या साहित्याचे वितरण करण्यात आले.समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेने महादेव कोळी मित्र मंडळ परिवहन यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिले.
यावेळी महादेव कोळी मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपीनाथ कुंदे यांनी देव हा माणसांमध्ये ,मुलांमध्ये बघायला मिळेल तसेच,पुणे,अहमदनगर,नाशिक,नंदुरबार,सह्याद्रीची पर्वतरांग ते सातपुडा अश्या जिल्ह्यामध्ये माझे आदिवासी बांधव आहेत.त्याठिकाणी दरवर्षी एक शाळा घेऊ असे बोलताना सांगितले.
शशी भांगरे यांनी आदिवासी समाज बांधव कसा पूढे जाईल. अजूनही आपण डोंगरदरीमधे राहतो त्यांनी शिक्षणाच्या प्रेरणेतून पूढे यावं असे सांगितले.
यावेळी उपस्थित सरपंच यशवंत बेंडकोळी,महादेव कोळी मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपीनाथ कुंदे,जिजाभाऊ भारमल,शिवाजी भांगरे,शिवाजी गोडे,बाळू शेळके,शाळेचे शिक्षक विकास भागित,भाऊराव भांगरे,क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठानचे सामाजिक कार्यकर्ते शशी भांगरे,नवसीराम साबळे,नामदेव घोरपडे,जगन भांगरे,नामदेव भांगरे,तसेच गावातील ग्रामस्थ ,महिला बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी विकास भागित यांनी आभार मानले.

