पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल व संत कोंडाजी बाबा कला व वाणिज्य महाविद्यालय कोतुळ यांच्या वतीने व रोटरी नेत्र रुग्णालय, संगमनेर यांच्या सहकार्याने कोतुळ येथे परिसरातील नागरिकांचे मोफत नेत्र( डोळे) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये 95 नागरिकांनी लाभ घेतला.त्यापैकी 11 नागरिकांना डोळे शस्त्रक्रिया करण्यास सांगितले असून 5 नागरिकांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.तर आश्रमशाळेतील मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
तर अर्पण ब्लड बँक संगमनेर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.तसेच उपस्थित 53 महिला व पुरुष यांची रक्तगट मधुमेह तपासणी करण्यात आली
यावेळी रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, रोटरी क्लब अकोलेचे माजी अध्यक्ष सचिन शेटे व सदस्य निलेश देशमुख तर रोटरी आय केअर हॉस्पिटलचे डॉ.संस्कार पाटील,संदीप घुले व बाळासाहेब देशमुख तर अर्पण ब्लड बँकेचे गणेश झोडगे,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय ताकटे,रा.सो यो कार्यक्रम अधिकारी प्रा अरूण वाकचौरे प्रा मच्छीन्द्र देशमुख, प्रा आवारी व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरास जि. प.सदस्या सुनीताताई भांगरे, सौ.निताताई आवारी,सेवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी बी.जे.देशमुख, जि. प.चे माजी उपाध्यक्ष सीताराम पा देशमुख, सयाजी राव देशमुख, भाऊसाहेब पवार पत्रकार अशोक शेळके, आर .बी देशमुख , सुरेशराव देशमुख, अशोकराव देशमुख ,संदीप शेणकर,अभिजित वाकचौरे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मच्छीन्द्र देशमुख यांनी केले तर प्रा विकास आवारी सर यांनी आभार यांनी मानले.यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

