पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी (सचिन लगड)-
अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या जायनावाडी येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चा यशस्वी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी तालुका महिला बचत गट व्यवस्थापक अमर कोळी यांनी प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.गावातील लहान मोठे पंधरा बचत गटांना तालुका महिला बचत गट व्यवस्थापक अमर कोळी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ग्राम संघाची स्थापना करण्यात आली.त्या ग्रामसंघाला वैष्णवी माता ग्राम संघ असे नाव देण्यात आले.सर्व महिलांनी एक मताने वैष्णवी माता ग्राम संघ असे नाव सांगितले.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विवीध पदांची निवड करण्यात आली.यावेळी तालुका महिला बचत गट व्यवस्थापक अमर कोळी यांनी सांगितले की,शासन आपल्या बचत गटांना भरपूर योजना किंवा कर्ज योजना पुरविल्या जातात त्याचा योग्य उपयोग बचत गटांनी केला पाहिजे. सरकारला त्यांच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी तो निधी दिला जातो असे बोलतांना सांगितले.यावेळी तालुका महिला बचत गट व्यवस्थापक अमर कोळी,कावेरी भांगरे(सी आर पी),अंगणवाडी सेविका अलका भांगरे,पंधरा बचत गटातील सर्व महिला,काळू भांगरे,गोरख भांगरे,सोमनाथ भांगरे,रोहिदास भांगरे,काळू भांगरे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
