पुण्य वार्ता
मुंबई | दिनांक २७ जून २०२५
दैनिक समर्थ गांवकरी चे मंत्रालय प्रतिनिधी श्री. विष्णु बुरे यांनी आज मुंबई येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर साहेब यांच्या कार्यालयात सदर वृत्तपत्राची प्रत भेट म्हणून सुपूर्द केली.
या भेटीदरम्यान जानकर साहेबांनी दैनिक समर्थ गांवकरी चे वाचन करताना ग्रामीण भागातील पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “गावपातळीवरील समस्या, जनतेचे प्रश्न आणि विकासाच्या घडामोडींना स्थानिक वृत्तपत्रांमधून अधिक प्रभावीपणे मांडले जाते. ‘दैनिक समर्थ गांवकरी’ हे असेच एक विश्वासार्ह माध्यम आहे जे ग्रामीण पत्रकारितेचा खरा आत्मा जपते.”
यावेळी त्यांनी पत्रकारितेच्या भूमिकेवरही सकारात्मक विचार व्यक्त केले आणि असे माध्यम जनतेच्या मनातील भावना पोहोचविण्यास उपयुक्त ठरतात असे सांगितले.
श्री. विष्णु बुरे यांनी दैनिक समर्थ गांवकरी चा उद्देश आणि ग्रामीण पत्रकारितेतील योगदान याबाबत माहिती दिली.
ही भेट दोन्ही पक्षांसाठी प्रेरणादायक आणि ग्रामीण पत्रकारितेला बळकटी देणारी ठरली.

