पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
कर्मचारी आणि व्यावसायिक फाउंडेशन देवठाण यांच्या वतीने
भातोडा नगर, दोडक नदी,देवाची वाडी, गहिनीनाथ नगर तसेच केंद्रशाळा देवठाण या
पाच शाळेमधील 105 गरजवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग पाणी बॉटल ,वह्या ,पेन इंग्रजी उजळणी ,मराठी उजळणी असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रामदास सोनवणे सर ,रामनाथ काकड सर उपस्थित होते अतिशय स्तुत्य असा उपक्रम मागील वर्षापासून देवठाण गावात राबविला जात आहे महेश सोनवणे सर
यांनी गावातील कर्मचारी आणि व्यावसायिक यांच्याकडून मदत मिळवून हा उपक्रम सुरू केलेला आहे.
साहित्य वाटपाच्या वेळी , फाउंडेशनचे सदस्य संदीप भोर,जुनेद इनामदार,किशोर घावटे,अंकुश. काकड,
सुधीर अण्णा शेळके, जालिंदर बोडके तुकाराम पाटोळे ,महेश सोनवणे सर,
असे अनेक सदस्य उपस्थित होते.

तसेच नितीन सहाणे सर ,प्रवीण सहाणे,
नितीन कथले,सचिन बोडके,राजेंद्र महाराज कराड,संजय शेळके प्रकाश शेळके असे अनेक ग्रामस्थ,पालक,व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष,उपाध्यक्ष ,सदस्य उपस्थित होते..
या फाउंडेशनला देवठाण, गावातील अनेक कर्मचारी आणि व्यावसायिक यांनी मदत केलेली आहे .
यामध्ये प्रणिता जगताप ,चेतन साबळे, श्रीधर गायकवाड,
अजित सहाणे, गोरक्ष सोनवणे सर , राम देशमुख ,तुकाराम पाटोळे, प्रकाश सोनवणे सर,अतिक इनामदार,चंद्रभान सोनवणे,सचिन जोरवर,राहुल जोरवर,अविनाश बोडके..विठ्ठल लहामगे,
विकास जोरवर,अमोल देशमुख ,विजय सोनवणे,अशा गावातील अनेक कर्मचारी आणि व्यावसायिक लोकांनी मदत केलेली आहे .
नक्कीच भविष्यात हा उपक्रम पुढेही चालू आहे राहील असे महेश सोनवणे सरांनी सांगितले .

त्यांनी पालक लोकांना तसेच गावातील दानशूर लोकांना आवाहन केले की राजकारण बाजूला ठेवून ,राजकारण विरहित एकत्र येवून,आपणही या उपक्रमात पुढील वर्षी सहभागी व्हा .
आणि गरजवंत विद्यार्थी ह्यांना मदत करा..


