पुन्य वार्ता
इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असुन तालुक्यात विकास कामांऐवजी आरोप प्रत्यारोप सुरु असुन आदिवासी समाजाला अद्यापही न्याय मिळत नसुन गोर गरीब जनतेसाठी या मतदार संघात रोजगारासाठी योजना राबविणार असल्याचं मत जन जनवादी पार्टीचे उमेदवार अनिल गभाले यांनी केले.
बाहेरून आलेले उमेदवार हे स्थानिक आदिवासी समाजाचा फक्त मतदानाच्या गणितात वापर करत आहेत, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंतीची अनेक उमेदवारांकडून आदरभावाची अभिव्यक्ती होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक समाजाच्या समस्या आणि त्यांचे हक्क मिळविण्यासाठी जन जनवादी पार्टीचे उमेदवार म्हणून अनिल गभाले निवडणुकीच्या रिंगणात उतरले असुन तालुक्यातील तळागाळातील युवकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या मतदारसंघातील आदिवासी शेतकरीवर्ग आजही विकासापासून वंचित राहत असुन गेल्या दहा वर्षांपासून भाताला जो भाव आहे तो तसाच आहे. तालुक्यातील धरणाचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे ते देशोधडीला लागले आहे.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून मी अनिल गभाले बिरसा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सतीश पेंदाम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात आदिवासी, शेतकरी,शेत मजूर, कामगार क्षेत्र,आरोग्य,शिक्षण,तरुणांना रोजगार या सर्व क्षेत्रात प्रगती करण्यासाठीची हमी देत आहे.आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या बळावर मी इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे तरी त्यासाठी आपल्या आशीर्वाद मिळावेत.
( फोटो )
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे प्रचाराचा शुभारंभ करतांना जन जनवादी पार्टीचे उमेदवार अनिल गभाले समावेत कार्यकर्त.
