पुण्य वार्ता
अकोले: ( प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान- गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित२०२४_२५ चे ५२वे जिल्हास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन गुरुवार दिनांक २३ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत अकोले तालुक्यातील वीरगाव येथील आनंदगड शैक्षणिक संकुलात संपन्न होत असल्याची माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस व जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.
या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती ना. राम शिंदे साहेब यांचे शुभ हस्ते संपन्न होणार असून पारितोषिक वितरण राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोले विधानसभा सदस्य आमदार डॉ. किरण लहामटे असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून शिर्डी चे खासदार भाऊसाहेब वाकचौरे अहिल्या नगरचे खासदार निलेश लंके विधानपरिषद सदस्य आ.किशोर दराडे आ. सत्यजित तांबे आ .शिवाजीराव गर्जे, विधानसभा सदस्य आ शिवाजीराव कर्डिले, आ.मोनिकाताई राजळे, आ .संग्राम जगताप ,आ.आशुतोष काळे आ. रोहित पवार ,आ.अमोल खताळ आ.हेमंत उगले, आ. विठ्ठलराव लंगे आ.काशिनाथ दाते, आ.विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे,आंतरभारती ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव अनिल रहाणे सर्व जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी, पंचायत समिती पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका शिक्षणाधिकारी अभय कुमार वाव्हळ यांनी दिली.
अहिल्या नगर जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून विज्ञान व गणित विभागातून प्रत्येकी दोन विद्यार्थी उपकरणे या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक विज्ञान व गणित विभाग, प्रयोगशाळा परिचर विभाग अशा एकूण २५०उपकरणांची नोंद या प्रदर्शनासाठी झाल्याची माहिती धनंजय भांगरे, सतीश काळे,श्याम मालुंजकर, बद्रीनाथ शिंदे, संजय कुमार निक्रड,सुनील धुमाळ ,सुनील पंडित, किरण चौधरी यांनी दिली .या जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बाळासाहेब घुगे, अमर माने, आकाश दरेकर, संध्या भोर ,संजयकुमार सरवदे,दत्तात्रय कवळे आदींनी केले आहे.

