पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय गणोरे येथे नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक ए वाय दिवे यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी उत्तर नगर कमिटी सदस्य आंबादास दातीर,जि.प.शाळा शालेय व्यव्यस्थापन माजी अध्यक्ष राजेंद्र आंबरे,बाबासाहेब आहेर,सरपंच संतोष आंबरे,आदी शाळेविषयी सूचना व मनोगत व्यक्त केले.
या वेळी मुख्याध्यापक दिवे यांनी शाळेविषयी तळमळ बाकीच्या ठिकाणी केलेले काम व अजून शाळेविषयी चांगले काम कसे करता येईल गुणवत्ता अजून कशी वाढेल हे आपल्या मनोगतातून सांगितले.नवीन इमारतीचे काम लवकरच चालू होईल असे सांगितले.
याववेळी मुख्याध्यापक ए वाय दिवे, उतर अहिल्यानगर कमिटी सदस्य आंबादास दातीर,सरपंच संतोष आंबरे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोकराव उगले, स्कुल कमिटी माजी अध्यक्ष संदीपभाऊ आंबरे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळचे व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष राजेंद्र आंबरे,सोसायटीचे चेअरमन भगवान खतोडे,सोसायटी माजी चेअरमन सूर्यभान आंबरे,अंबिका माता देवस्थान ट्रस्ट सदस्य बाळासाहेब आहेर,ग्रामपंचायत माजी सदस्य बाळासाहेब शिंदे,बाबासाहेब आहेर, पत्रकार राजेंद्र आंबरे,किरण आहेर,सुरज दातीर,दीपक दातीर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आभार जाधव सर यांनी मांडले.


