पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
युवा नेते श्री अमित अशोकराव भांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. वक्तृत्व स्पर्धेत 150 स्पर्धकांनी सहभाग नोंदवत नव्या जोशात स्पर्धा संपन्न झाली. महाविद्यालयीन गटात प.पू गगनगिरी महाराज महाविद्यालय पिंपरणे तालुका संगमनेर ची विद्यार्थी कु जान्हवी भागवत घुले हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जान्हवी घुले हिने स्पर्धेत शरदचंद्रजी पवार साहेब धुरंदर राजकारणी या विषयावर आपले परखड विचार व्यक्त केले. थोड्या दिवसात अकोले येथे आयोजित मेळाव्यात मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते जान्हवी घुले हिला पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मध्ये ट्राॅफी , सन्मान पत्र व रोख 5001रु देऊन गौरविण्यात येणार आहे.
जान्हवी घुले हिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री बापुराव देशमुख तसेच प्राचार्य श्री वाळे सर वर्गशिक्षिका श्रीमती कुटे मॅडम व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे.



