पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- निळवंडेसह १३ जलाशयाची निर्मिती करून माजी मंत्री
स्व. मधुकरराव पिचड यांनी तालुका नव्हे, तर जिल्ह्याला पाणी देऊन पाणीदार बनविण्याचे काम केले आहे. दुष्काळग्रस्त भागाला नवसंजीवनी देण्याऱ्या माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे नाव निळवंडे जलाशयाला द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी व निळवंडे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
स्व. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अस्थिकलश अकोले शहरातून टाळ-मृदंगाच्या निनादात दर्शनासाठी नेण्यात आला. त्यानंतर अगस्ती मंदिरात महाआरती करून उपस्थित ग्रामस्थ, शेतकरी, महिला, युवकांनी दर्शन घेवुन टाकळी ,ढोकरी फाटा, उंचखडक,मेहंदुरी फाटा व गाव, म्हाळादेवी,निंब्रळ मार्गे अस्थिकलश निळवंडे जलाशयाकडे नेण्यात आला. तेथे अस्थी विसर्जन करण्यात आले.

यावेळी नेवासा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे, शेतकरी नेते दशरथराव सावंत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, कारभारी पा.उगले, जि. प.अर्थ व बांधकाम विभागाचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे,शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, भाजपचे सीताराम पा भांगरे, अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पा .गायकर, भानुदास गायकर, सीताराम पा. देशमुख, राजेंद्र देशमुख, भाजपचे तालुका अध्यक्ष यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर,सचिव सुधाकर देशमुख, वकील वसंतराव मनकर,अशोकराव देशमुख, गोरख मालुंजकर,आनंदराव वाकचौरे,संदीपराव शेटे,संतोष बनसोडे, शांताराम संगारे,शिवाजी अरज,दिलीप हासे, बाबासाहेब उगले,रामहरी तिकांडे,खंडू बाबा वाकचौरे,बाळासाहेब वडजे,बाळासाहेब सावंत, सौ प्रतिभाताई मनकर,सोपान देशमुख,नितीन नाईकवाडी, गिरीजा पिचड, जय पिचड, पिचड, दराडेताई उपस्थित होते.

जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ यांनी मी तालुक्यातील राजकारणात नेहमी पिचड यांच्याविरोधात राजकारण केले. मात्र, स्व. पिचड यांनी माझ्याविषयी राग मनात न ठेवता मला मदतच केली. त्यामुळे मी गेली १२ वर्षांपासून पिचड यांच्या सोबत राजकारण करतो. या तालुक्याला पिचड यांच्या रूपाने दैवी देणगी लाभली आहे.
येथील आढळा प्रवरा, मुळा क्षेत्रात पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकरी समृद्ध झाला निळवंडे जलाशयाचे आधी पुनर्वसन मग धरण हा पॅटर्न महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. त्यामुळे पिचड यांचे नाव निळवंडे जलाशयाला देण्याचा ठराव त्यांनी
मांडला त्यानंतर ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, मधुकर नवले, सीताराम पा. गायकर, धरणग्रस्त व यशवंतराव अभाळे, राजेंद्र डावरे, श्री.कोकणे व निळवंडे प्रकल्प ग्रस्त, धरणग्रस्त शेतकऱ्यांनी व सर्व पक्षीय नेत्यांनी घेऊन जलाशयाला स्व.मधुकरराव पिचड यांचे नाव देण्याचा ठराव केला . यावेळी मधुकरराव नवले यांनी सर्व चळवळींच्या आठवणींना उजाळा देत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मोठे योगदान असल्याने त्यांचे नाव निळवंडे धरणाला द्यावे तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.तर जेष्ठ नेते दशरथराव सावंत यांनीही यास दुजोरा देत आ विठ्ठलराव लंघे यांना याबाबत पाठपुरावा करावा अशी विनंती केली. यावेळी आ.विठ्ठल राव लंघे यांनीही या नावासाठी मी शासन पातळीवर योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. शिवाजीराजे धुमाळ यांनी मांडलेल्या ठरावास सर्व उपस्थितांनी संमती दिली.


