पुण्य वार्ता
संगमनेर प्रतिनिधी
वडगांव लांडगा येथील ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श इंग्लीश स्कूल विद्यालयामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक कैलास रामराव जावळे M.A.B.Ed( मराठी ) व दुसरे शिक्षक श्रीम.सोनाली शेषराव शेवाळे B.Sc. B.ed (physics )यांची नेमणूक झाली .
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पदवीधर शिक्षक राजेंद्र गोविंदराव सदगीर सर M.A.B.ed (मराठी ),दुसरे शिक्षक राजेंद्र कदम सर (B. A.D. ed, तिसरे शिक्षक गणेश रक्टे सर M. A. D. Ed ) यांची नेमणूक झाली .
नविन नेमणूक झालेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा वडगांव लांडगा ग्रामस्थांचे वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला .
तसेच केरळ येथील थुंबा अंतराळ मोहिम केंद्र ( इस्रो) येथे विमान वैज्ञानिक सहलीसाठी निवड झालेला विद्यार्थी कु . सत्यजित देशमुख यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला .
गावाच्या भौतिक विकासाबरोबरच शैक्षणिक विकास पण अति महत्वाचा आहे म्हणून गावातील शैक्षणिक विकासाला हातभार लावण्याच्या दृष्टीकोणातून आजच्या सत्काराचे प्रयोजन .
याप्रसंगी मोहन लांडगे सर , अनिल लांडगे , मनोहर दिवटे , प्रा. गोरख लांडगे , गोरख हांडे ,लक्ष्मण हांडे सर ,धनराज लांडगे , नवनाथ डोंगरे ,अशोक महाले , अतुल कानवडे , माधव मोरे , राजेंद्र अरगडे ,धनंजय गोसावी , बाळासाहेब कर्पे इ.ग्रामस्थ तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

