पुन्य वार्ता
लिंगदेव (प्रतिनिधी) :- अकोले तालुक्यातील लिंगदेव हे गाव मुळा नदी फेरी वसलेले आहे सुजलाम सुफलाम असलेल्या या गावाला एक धार्मिक परंपरा लाभलेली आहे .भगवान लिंगेश्वराचे जागृत देवस्थान म्हणून नवसाला पावणारे श्रद्धास्थान म्हणून मानले जाते. नुकताच या देवस्थानला ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. अकोले तालुका व अहमदनगर जिल्ह्यात एक नावा रोपाला आलेले देवस्थान म्हणून यांची ख्याती महाराष्ट्रातही आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आहे.
गुढीपाडवा यात्रेनिमित्त या गावांमध्ये संगीत आखाडी बोहडा हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजत असतो. एक ऐतिहासिक परंपरा लाभलेले हे भगवान लिंगेश्वर देवस्थान हे तालुक्यात महत्त्वपूर्ण असणारे देवस्थान आहे. या देवस्थानची ची ट्रस्ट ही नव्याने स्थापन होऊन या ट्रस्टच्या अध्यक्षपदी डी.बी फापाळे तर उपाध्यक्षपदी दत्तू कानवडे ,सचिवपदी पी वाय जाधव सर तर खजिनदार पदी एकनाथ रामभाऊ कानवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी या भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये नवीन निवड झालेल्या विश्वस्त मध्ये डी.बी फापाळे सर ,पी.वाय जाधव सर ,एकनाथ रामभाऊ कानवडे,दत्तू महादू कानवडे, कानवडे रामकृष्ण बाबुराव ,कोरडे एकनाथ कारभारी , आंबरे निवृत्ती भाऊसाहेब, फापाळे कैलास भागा ,कानवडे एकनाथ रामभाऊ सुरेश गेनु कानवडे , हांडे सुदाम तबाजी , भाऊसाहेब निवृत्ती पवार , शहा सुनील हिम्मतलाल, कानवडे सदाशिव भिमाजी, बाळशिराम नामदेव आढाव ,कानवडे बन्सी पोपट, फापाळे दत्तू निवृत्ती , फापाळे हरिभाऊ मंजुळ, हाडवळे उत्तम बाळकृष्ण , हाडवळे भाऊसाहेब बाबुराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड के.पी हांडे यांनी काम बघितले.या निवडीचे लिंगदेव ग्रामस्ताकडून स्वागत करण्यात आले.
