पुन्य वार्ता
लिंगदेव (प्रतिंनिधी ) :- अकोले तालुक्यातील मुळा नदीवर निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या लिंगदेव येथे भगवान लिंगेश्वराचे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी गुडी पाडवा व महाशिवरात्री निमित्ताने मोठी यात्रा भरते . महाशिवरात्र निमित्ताने येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मिती माघ वद्य ७ (सप्तमी ) शके १९४६ गुरुवार दिनाक २०फेब्रुवारी २०२५ ते माघ वद्य १४ शके १९४६ गुरुवार दिनाक २७ मार्च २०२२ या काळात आयोजन करण्यात आले आहे .या सप्ताह काळात पहाटे ०४ वाजता काकड आरती सकाळी ०७:३० ते ११ वा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी ०१ ते ०३ भजन सेवा दुपारी ०३:३० ते ०४:३० गाथा भजन सेवा ,सायंकाळी ०४ :३० ते ०५:३० प्रवचन , सायंकाळी ०६ ते ०७ हरिपाठ , रात्री ०८ ते ११ वा किर्तन सेवा चे आयोजन करण्यात आले आहे . या सप्ताह काळात नामवंत गुणवंत किर्तनकार तसेच प्रवचन कार महाराष्ट्रातून आपली किर्तन व प्रवचन सेवा बजावणार आहे .
या सप्ताह काळात प्रथम दिनी २०/०२ २०२५ रोजी किर्तनकेसरी ह.भ.प विवेक महाराज केदार, अकोले यांची किर्तन सेवा तर ह.भ.प प्रदीप महाराज होलगीर लिंगदेव यांचे प्रवचन , द्वितीय दिनी २१/०२/२०२५ विद्या विनोद वैभव ह.भ.प प्रकाश महाराज साठे ,बीड तर प्रवचन ह.भ.प परशुराम महाराज कानवडे , तृतीय दिनी २२/०२/२०२५ रोजी वारकरी भूषण ह.भ.प अशोक महाराज इलग शास्त्री ,शेवगाव तर प्रवचन दास काका शिरसागर लिंगदेव ,चतुर्थ दिनी २३/२/२०२५ महंत ह.भ.प प्रमोद महाराज जगताप बारामती तर प्रवचनकार ह.भ प बाळासाहेब महाराज शेटे पंचमदिनी २४/२/२०२५समाजप्रबोधनकार ह.भ.प संतोष महाराज पायगुडे पुणे तर प्रवचन ह.भ.प हौशीराम महाराज कोल्हे पेमगिरी ,षष्टम दिनी २५/२/२०२५भगवताचार्य ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज आळंदी तर प्रवचन ह.भ.प विश्वनाथ महाराज शेटे पिंपळगाव खांड, सप्तम दिनी २६/२/२०२५महाशिवरात्र भागवताचार्य ह.भ.प शंकर महाराज शेवाळे, मंचर तर सायंकाळी पालखी नगर प्रदक्षिणा , अष्टम दिनी २७/२/२०२५ संतचरित्रकार ह.भ.प भगिरथ महाराज काळे , सिन्नर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे .या सप्ताह काळात संगीत साथ मृदुंगाचार्य ह.भ.प शांताराम महाराज पापळ , सचीन महाराज चौधरी गायनाचार्य ह.भ.प अशोक महाराज लांडे ह.भ.प शांताराम महाराज कोल्हाळ तसेच नामवंत आदी हजर राहणार आहे .
या सप्ताह काळात गावातील नामवंत व्यक्तींनी महाप्रसाद योगदान केले आहे तसेच विशेष देणगीदार म्हणुन आर्थिक सहकार्य केले गेले आहे . सांगीतिक सहकार्य श्री लिंगेश्वर शिक्षण संस्था लिंगदेव , विणेकरी ह.भ.प कारभारी गंगाराम कोरडे , ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नेतृत्व ह.भ.प दासकाका महाराज क्षीरसागर/ ह.भ.प परशुराम महाराज कानवडे चोपदार ह.भ.प रखमाजी हाडवळे, ह.भ.प आत्माराम पवार, ह.भ.प कोरडे, अशोक कोरडे तर श्री त्र्यंबकेश्वर भक्ति ज्योत व्यवस्थापन श्री लिंगेश्वर युवा मित्र मंडळ ,लिंगदेव भक्ती ज्योत अन्न दान सेवा गोपाल हाडवळे, महेश हाडवळे, सागर कानवडे, ऋषिकेश पवार, मिलिंद ढोकरे, मच्छिंद्र फापाळे , पुष्पहार सहकार्य लिंगेश्वर फ्लावर्स कंपनी लिंगदेव सागर सोपान फापाळे आदि नि सहकार्य केले आहे . हा सप्ताहाचा अहमदनगर जिल्हा अकोले तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे . असे देवस्थानचे अध्यक्ष डी.बी फापाळे सर यांनी संगितले आहे .
हरिभाऊ फापाळे
9371806083
