पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी-
जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगल काम करता तेव्हा तुमच्या आयुष्यात त्याच चांगल्या गोष्टी परत येतात.नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही.जी माणसं जीवनात संघर्ष करतात,इतिहास एक दिवस नक्की दखल घेतो.असे प्रतिपादन लोकप्रिय आमदार डॉ.किरण लहामटे यांनी केले.
महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव नाकविंदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी आमदार डॉ. लहामटे व्यासपिठावरुन बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.वसंतराव मनकर हे होते.
याप्रसंगी वडगाव शेरी,पुणे विधानसभेचे सदस्य बापुसाहेब पठारे,महादेवराव पठारे,मंगेश नवले,प्रकाश पठारे, बबन पठारे, मिलिंद बागुल,रत्नाकांत भुजबळ, शिक्षण विस्तारअधिकार सविता कचरे,केंद्रप्रमुख देवेंद्र आंबेटकर,ज्ञानेशानंद शास्त्री,अर्जुन टोपे,प्रमोद मंडलिक,बबन टिकांडे,सरपंच लक्ष्मण सोंगाळ,उपसरपंच मारूती काळे,भाऊसाहेब कासार,विजय गायकवाड,संपत लगड,बबन आभाळे,नवनाथ जाधव,माधव बोऱ्हाडे,खंडू काळे,प्रकाश कासार,गोरख आभाळे, सुमन आढळ,विनोद हांडे,मारूती आभाळे,राधाकिसन लगड,विलास काळे यांसह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
आमदार डॉ.लहामटे यांनी उदयाचा भारत आपल्यातून घडतोय याची जाणीव ठेवा.संस्काराचे जतन करा. निर्व्यसणी रहा.मोठी स्वप्न पहा. स्वतःच्या जोरावर अस्तित्व उभ करा. असे विचार व्यक्त केले.
आमदार बापुसाहेब पठारे यांनी पैशाने माणसं मोठी होतात अस नाही तर संस्काराने माणसं मोठी होतात. त्यासाठी स्वतःच्या पायावर उभे रहा. अभ्यास करा.ज्ञान मिळवा,भवितव्य घडवा.जिद्ध मनात ठेवा अशक्य ते शक्य होते.असे प्रतिपादन करून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात विद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने अभिनंदन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.वसंत मनकर,शिक्षण विस्तार अधिकारी साविता कचरे,मिलींद बागुल,महादेवराव पठारे,उपसरपंच मारूती काळे आदींनी मनोगत व्यक्त करत विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य सुनिल धुमाळ यांनी केले.सुत्रसंचलन रामदास कासार यांनी केले तर शिक्षक बँकेचे संचालक अण्णासाहेब ढगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

