पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- सिन्नर तालुक्यातील कासारवाडी च्या मधेवस्ती येथे रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने अंध मुक्त गाव अभियानांतर्गत
७५ नागरिकांनी मोफत डोळे तपासणी चा लाभ घेतला असून त्यापैकी १७ जणांना मोतीबिंदू ऑपरेशन साठी सुचविले असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. किरकोळ इन्फेक्शन असलेल्या रुग्णांना अकोले येथील रोटरी नेत्र( डोळे) तपासणी केंद्रामध्ये पुढील उपचारासाठी बोलवले आहे.
रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे सेक्रेटरी अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने अंध मुक्त गाव अभियान हाती घेतले असून समस्त ग्रामस्थ कासारवाडी व रोटरी आय केअर हॉस्पिटल संगमनेर यांच्या विशेष सहकार्याने मधेवस्ती( कासारवाडी,सिन्नर) येथे मोफत नेत्र(डोळे) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते,सेक्रेटरी अमोल देशमुख,माजी अध्यक्ष सचिन शेटे
आणि उपसरपंच अशोक देशमुख, योगेश देशमुख ,तंटामुक्ती अध्यक्ष निलेश देशमुख, विनायक देशमुख, महेश देशमुख ,संदेश देशमुख, जालिंदर खैरनार ,गुलाबराव देशमुख, अशोकराव देशमुख, संपतराव देशमुख, शरद भा देशमुख नाना पावसे, सुभाष धुमाळ, लक्ष्मण मधे, दिपाली मधे,पंढरी मधे, भारत कडाळे तसेच नेत्र तपासणी शिबिरासाठी रोटरी आय केअर हॉस्पिटल संगमनेर चे प्रतिनिधी
डॉ. रोहित शिंदे,
शिबिर सहाय्यक गौरव जोशी,
बाळासाहेब देशमुख
उपस्थित होते.
यावेळी कासारवाडी येथील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

