पुण्य वार्ता
हिवरगाव प्रतिनिधी
हिवरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी शिवतेज अस्मिता प्रदीप उगले याची इस्रो साठी निवड
जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर (थुंबा )केरळ शैक्षणिक सहल जिल्हा स्तर निवड चाचणी उत्तीर्ण होऊन इस्रो सहलीसाठी शिवतेज अस्मिता प्रदीप उगले याची निवड झाली. शिवतेजने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव येथे पहिली ते चौथीपर्यंत चे शिक्षण घेतले असून आत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव निपाणी येथे पाचवीत शिक्षण घेत आहे . पहिली ते चौथी शिक्षण घेत असताना वर्गशिक्षक रवी रूपवते सर व बंडू वाकचौरे सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच आई जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका अस्मिता उगले (ठुबे) तसेच वडील प्रदिप उगले सर यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले शिवतेजतचे संपूर्ण अकोले तालुक्यात कौतुक होत आहे. अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री अभय कुमार वाव्हळ साहेब, देवठाण बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री अनिलजी गायकवाड साहेब तसेच गणोरे केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री सुनील जी घुले साहेब हिवरगाव सरपंच माननीय सौ. शांताताई मेंगाळ माजी उपसरपंच कावेरी ताई बोंबले ग्रामपंचायत सदस्य अमोल अशोकराव ठुबे मार्केट कमिटी संचालक भाऊसाहेब नाईकवाडी ,अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक बादशाह पाटील बोंबले , अशोक रेवगडे सर ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोषजी नाईकवाडी ,रुतुजा आंबरे ,पुनम कोळगे, यावेळी प्रवीण कदम गणेश दराडे विविध कार्यक्रम सोसायटीचे संचालक भाऊसाहेब कुरकुटे गणेश जी कदम ओंकार आंबरे व इतर ग्रामस्थ यांनी शिवतेज चे अभिनंदन केले.
