पुन्य वार्ता
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा भव्य सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. या अधिवेशनात “दैनिक समर्थ गांवकरी” या विशेषांकाचे वाचन एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या संपादिका मा. सरिता कौशिक यांनी दैनिक समर्थ अंकाचे वाचन केले…
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सरिता कौशिक यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. त्यांनी ग्रामीण पत्रकारितेचे महत्त्व . विशेष म्हणजे, हा विशेषांक ग्रामीण पत्रकारांचे आवाज ठरतो आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच “दैनिक समर्थ गांवकरी”चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले. त्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे, पत्रकार बंधू-भगिनींचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
अधिवेशनात राज्यभरातून आलेल्या पत्रकारांनी एकमेकांशी विचारमंथन करत पत्रकारितेच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा केली. “दैनिक समर्थ गांवकरी”च्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.

