अभिनव शिक्षण संस्था संचलित ,अभिनव कॉलेज ऑफ सायन्स व मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यामाने, आपत्ती व्यवस्थापन समिती अंतर्गत “सर्पदंश व त्यावरील उपाय योजना ” ही कार्यशाळा संपन्न झाली, एम सी बी टी राईट्स इन्स्टिट्यूट अंतर्गत प्रा.विवेक दातीर यांनी ही कार्यशाळा घेतली. यामध्ये सर्पदंश व त्यावरील उपाय योजना यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली .सर्पदंशी सापांची व इतर प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठीची संरक्षक यंत्रणा आहे. विषारी साप चावण्याला सर्पदंश म्हणतात याचा मज्जा संस्था, हृदय किंवा रक्त उत्पादक अवयवांवर परिणाम होऊ शकतो. त्याचा वेळेत उपचार न केल्यास प्राण घातकही ठरू शकते असे ते म्हणाले .किंग कोब्रा, मन्यार ,फुरसे आणि घोणस सारख्या सापांच्या चावण्याला सर्पदंश म्हणतात .जर सर्पदंश झाला; तर प्राथमिक उपचार व निदान याची माहिती विद्यार्थ्यांना असावी असेही ते म्हणाले. ज्या व्यक्तीला सापाने दंश केला आहे ,त्याला घाबरवण्यापेक्षा शांत करण्याचा प्रयत्न करणे .कारण घाबरल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊन विष संपूर्ण शरीरात पसरते. चाव्याच्या जागा कोरड्या असेल पट्टी किंवा कपड्याने झाकणे. ज्या केंद्रात विष प्रतिरोधक त्वरित मिळू शकेल अशा ठिकाणी त्या व्यक्तीला लगेच हलवणे. चाव्याजवळ कापड बांधून नका यामुळे परिसंचारण बंद होऊ शकते. जखमेतून विष शोषून घेण्याचा देखील प्रयत्न करणे चुकीचे असते असेही त्यांनी सांगितले. सर्पदंशापासून जर तुम्हाला वाचायचे असेल त्यांनी या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवल्या पाहिजे .ज्यावेळेस दाट गवतातून किंवा साहसी उपक्रमांना जाण्यापूर्वी जाड बूट आणि लांब पॅन्ट घालावी, रात्री टॉर्च किंवा दिवा घेऊन बाहेर पडावे, कोणताही खडक किंवा दगड हलवताना किंवा स्वयंपाक करण्यासाठी लाकूड गोळा करताना आणि डोंगराळ भागात फिरताना सावध राहावे .स्टोअर किंवा बेसमेंट मध्ये साप किंवा उंदरांसाठी योग्य रिपेलेंट वापरावे. सापांना पाळीव प्राणी म्हणून ठेवणे टाळावे .अशा पद्धतीने तुम्ही स्वतः दक्ष रहावे व इतरांना देखील सावधगिरी बाळगण्यास सांगावे .यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष तथा वसुंधरा अकॅडमीच्या प्राचार्या डॉ.जयश्री देशमुख ,संस्थेच्या सहसचिव तथाप्राचार्य अल्फोंसा डी., अभिनव कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्या प्रा. कुसुम वाकचौरे ,जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा .स्मिता पुंड , श्री.हर्षवर्धन शेटे , शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .मेंगाळ सुरेश यांनी केले तर आभार प्रा .शिला देशमुख यांनी व्यक्त केले.

