पुण्य वार्ता
कळस ( प्रतिनिधी ):- अमृतवाहिनी प्रवरामातेच्या तीरावरती वसलेल्या ब्रह्मलीन प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र कळस बु येथे ऋषिपंचमी ते वामन जयंती पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व संत तुकाराम महाराज गाथा भजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
रविवार दि. 8 सप्टेंबर ते रविवार दि. 15 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांचे कार्यक्रम आयोजित केले आहे. यात अगस्ती पालखी सोहळ्याचे प्रमुख हभप राजेंद्र महाराज नवले, अगस्ती देवस्थानचे विश्वस्त गणेश महाराज वाकचौरे, कीर्तन केसरी महादेव महाराज राऊत, बीड अर्जुन महाराज मोटे, पळशीकर प्रकाश महाराज जंजिरे, कर्जत समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांचे कीर्तन तर हभप संस्कृती ताई वाकचौरे, संदीप महाराज सावंत, कळसेश्वर देवस्थान देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम महाराज वाकचौरे, कैलास महाराज आहेर, गायनसम्राट अरुण महाराज शिर्के, अगस्ती देवस्थान विश्वस्त दिपक महाराज देशमुख व विष्णु महाराज वाकचौरे सर यांची प्रवचन सेवा आयोजित केली असून ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक नेवासा यांचे काल्याचे किर्तन आयोजित केले आहे
या निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ह.भ.प. निवृत्ती महाराज बिबवे, मृदुंगाचार्य संकेत महाराज आरोटे, गायकवृंद किरण महाराज शेटे, अनिल महाराज रुपवते, प्रवीण महाराज पांडे उपस्थित राहणार आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी आवाहन कळसेश्वर भजनी मंडळ कळस बुद्रुक समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

