पुन्य वार्ता
संगमनेर वार्ताहर
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्रसारमाध्यम व इंग्रजी विभाग प्रमुख जेष्ठ अधिव्याख्याता श्री. अरुण सांगोलकर
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने इंग्रजी साहित्यासाठीची पीएच.डी जाहीर करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सांगोलकर यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये ऑस्ट्रेलियन साहित्यातील “डिसलोकेशन ॲन्ड कल्चरल एलियनेशन: अ स्टडी ऑफ द सिलेक्ट नॉवेल्स ऑफ इवा सॅलिस” या विषयावर प्रदीर्घ संशोधन करून विद्यापीठाकडे पी.एच.डी. प्रबंध सादर केला होता.
या प्रबंधासाठी मा. प्रा. डॉ. राजश्री बारवेकर, इंग्रजी अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना संशोधनाबद्दल पीएच.डी. जाहीर झाल्याबद्दल परिषदेचे संचालक राहुल रेखावार, सहसंचालक अनुराधा ओक, उपसंचालक डॉ . कमलादेवी आवटे, श्रीमती शिंदे , श्रीमती सावरकर, श्री दीपक माळी, श्री फुंदे, अरुण जाधव, दत्तात्रय थिटे, सचिन चव्हाण, आदेश अनेकांनी अभिनंदन केले आहे.
