पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी — शिर्डी लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्ष निरिक्षक आमदार रिता चाैधरी,राजस्थान व जिल्हाध्यक्ष जयंत वाघ याच्या उपस्थितीत रविवार दि २० ऑक्टोबर २०२४ रोजी अकोलेत काँग्रेस पक्ष पदाधिकारी बैठक आयोजित केली असल्याची माहिती जेष्ठ नेते व जिल्हा बॅकेचे संचालक मधुकरराव नवले यांनी दिली.
अकोलेतील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी माहिती देताना सांगितले की, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले व विधिमंडळ नेते तथा माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदार संघातील विधानसभा निवडणूकीसाठी पक्ष निरिक्षक म्हणून आ.रिता चाैधरी,राजस्थान यांची नेमणुक केली आहे.ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या आहेत. अकोले विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी आ.चाैधरी रविवार दि २० ऑक्टोबर २०२४ रोजी अकोले शहरात येत असुन सकाळी ११ वा अकोले वि.का.से.सोसायटी च्या सभागृहात मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहे.यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष श्री जयंत वाघ हेही उपस्थित राहणार आहेत .
तरी जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मधुकरराव नवले यांनी केले आहे .

