पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी — अकोले तहसील कार्यालय (नवीन इमारत) विधानसभा निवडणुकीचे मुख्यालय राहणार अकोले मतदारसंघातील एकूण ३०७ मतदान केंद्रावर २ लाख ६६ हजार २७९ मतदार आपला हक्क बजावतील. आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे बजावण्यासाठी ६ पथके नियुक्त करण्यात आली आहे
अकोले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) अहिल्यानगर श्री.अनुपसिंह यादव यांनी दिली. पत्रकरानां हि माहिती देत असताना सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अकोले डॉ. सिद्धार्थ मोरे उपस्थित होते.
दरम्यान सुरूवातीला केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून मंगळवार, दि. १५ पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्यांची काटेकोरपणे सर्वांनी अंमलबजावणी करावी असे आवाहन सर्व राजकीय पक्षांना निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अनुपसिंह यादव यांनी केले. तसेच
अकोले विधानसभा मतदारसंघासाठी अकोले तहसील कार्यालय (नवीन इमारत) निवडणूकीचे मुख्यालय असून सर्व इच्छुक उमेदवारांनी दि २२ ऑक्टोबरपासून याच ठिकाणी आपले उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे २१६ अकोले विधानसभा मतदान प्रक्रियेसाठी एकूण ३०७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून या सर्व मतदान केंद्रावर एकूण २ लाख ६६ हजार २७९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १ लाख ३८ हजार ९०६ पुरुष मतदार तर १ लाख २७ हजार ३७२ महिला मतदारांचा समावेश आसल्याचे सांगितले.
तर ही निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव यांनी तहसील कार्यालय (नवीन इमारत) सभागृहात अकोले तालुक्यातील सर्व नोडल अधिकारी, राजकीय पक्ष पदाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल तसेच FST/VST/VVT टीम यांची मिटिंग घेतली. मिटिंग मध्ये निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करुन सूचना दिल्या.

