पुन्य वार्ता
अकोले,: तालुक्यातील वीरगाव येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनि. कॉलेज येथे आनंददायी व भयमुक्त वातावरणात परीक्षा सुरु झाली. गट शिक्षणाधिकारी अभयकुमार व्हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली व विस्तार अधिकारी तथा परिरक्षक बाळासाहेब दोरगे यांच्या नियंत्रणाखाली ही परीक्षा सुरु झाली.
परीक्षा केंद्रावर आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव अनिल रहाणे, प्राचार्य किरण चौधरी, वसतिगृह अधीक्षक रवींद्र आंबरे, कॅम्पस डायरेक्टर प्रा. संदीप थोरात, केंद्र संचालक शरद तुपविहिरे, देविदास चारोडे, सीमा दिघे, मयुरी कोल्हे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खैरनार साहेब यांनी परीक्षा केंद्रास भेट दिली. कुंभेफळ केंद्राचे केंद्रप्रमुख बी. जी. आरोटे, आभाळे के. डी., रेखा देशमुख हे पूर्णवेळ बैठे पथक म्हणून उपस्थित होते.
या केंद्रावर एकूण 189 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले असून सर्वोदय विद्या मंदिर राजूर ज्युनि. कॉलेजचे प्रा. शरद तुपविहिरे केंद्र संचालक, तर धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य किरण चौधरी उपकेंद्र संचालक म्हणून काम पाहत आहेत.या परीक्षा केंद्रावर धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनि. कॉलेज वीरगाव, अढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवठाण, महात्मा फुले कनिष्ठ विद्यालय गणोरे येथील विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

