पुन्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी-
पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यरत असणारे दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे कार्यालयातील काम पाहून सुट्टीच्या दिवशी गड-किल्ले भटकंती छंद जोपासला आहे. यांची आतापर्यंत महाराष्ट्रातील तब्बल 105 गड किल्ल्यांची भटकंती केली आहे. त्यातील महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ल्यांपैकी कलावंती दुर्ग (जिल्हा रायगड), हरिहर किल्ला, औंढा (जिल्हा नाशिक)
मोरोशीचा भैरवगड (जिल्हा ठाणे)
अलंग मदन कुलंग (जिल्हा अहिल्यानगर) शिंदोळा (जिल्हा पुणे)
रायगड, तोरणा असे अनेक अवघड किल्ले सर केलेले आहेत.यापूर्वी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 90 किल्ल्यांची नोंद घेतलेली आहे,तसेच महाराष्ट्रातील सर्वात अवघड हरिचंद्र गड वरील कोकणकडा १९०० फुट खोल कोकणकडा रॅपलिंग करून ठाणे जिल्ह्यात जाण्याचा पहिला सहास दिव्यांग व्यक्तीची विक्रम पण इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेतलेली आहे.कळसुबाई शिखर १२ वेळा सर केलेला आहे याची नोंद गिनीज वर्ल्ड बुक मध्ये झालेली आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील 111 दिव्यांगांना कळसुबाई शिखरावर घेऊन जाणे केशव भांगरे यांचा मोलाचा सहभाग होता. त्याची नोंद ब्राव्हो विश्वविक्रम नोंद घेतलेली आहे, याबाबत सर्व दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. तसेच अकोले तालुक्यातील विश्रामगड, बितनगड, रतनगड, भैरवगड (शिरपुंजे) , भैरवगड (कोथळे) , हरिश्चंद्रगड, कल्लाड गड, कुंजर गड, अपरिचित पिंपळगाव नाकविंदा दुर्ग, अलंग मदन कुलंग , पाबर गड, अपरिचित रत्नागिरी गड गर्दनी सर्वच गड-किल्ले- अपरिचित दुर्ग त्यांनी सर केलेले आहेत. महाराष्ट्रातील व इतर राज्यातील 200 पेक्षा जास्त पर्यटन स्थळांची सफर केलेली आहे, तसेच रायगड जिल्ह्यातील ३ दिवसात १० सागरी किल्ले सर केलेले आहेत, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्रातून २० पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
जिल्हा परिषद अहमदनगर स्पेशल गड-किल्ले भटकंतीसाठी “दिव्यांग भूषण पुरस्कार” , दिव्यांग योद्धा पुरस्कार, शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार, स्वज्योत पुरस्कार, सह्याद्री रत्न पुरस्कार, कलारत्न भूषण पुरस्कार , राज्यस्तरीय दुर्ग भ्रमंती व महाराष्ट्र गौरव पुरस्कार यासारख्या महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी गड किल्ले भ्रमंती व संवर्धन संस्था जिल्हा- संभाजीनगर सर्वात जास्त गड-किल्ले भटकंती केलेली आहे, महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्था पॉईंट ब्रेक अडवेंचर नाशिक ,दादर ट्रेकर्स ग्रुप मुंबई, शिव सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप सिन्नर जिल्हा नाशिक, सातवाहन ट्रेकर्स ग्रुप कोतुळ जिल्हा अहिल्यानगर, सह्याद्री एडवेंचर ग्रुप पुणे, द ट्रॅक सह्याद्री मुंबई व जुन्नर दुर्गोत्सव पुणे, आमच्या सोबत व सहकार्याने काही गड-किल्ले सर केलेली आहे, तसेच तालुक्यातून व इतर जिल्ह्यातून मित्रपरिवार मोठा असल्याने त्यांच्या सोबत गड-किल्ले भटकंती केलेली आहे. तेलंगाना बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबाबत सर्व स्तरातून राज्यातून दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे कौतुक होत आहे.
