पुन्य वार्ता
रायगड – प्रतिनिधी: राकेश खराडेखरे रत्न शोधण्याचे काम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून झाले आहे पत्रकार हा नेहमीच समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडत असताना ज्यांनी चांगले काम केले त्यांच्या पाठीवर शाबासकी देण्याचे काम राज्य पत्रकार संघाने केले आहे हे काम भविष्यकाळात देखील कौतुकास्पद राहील ज्यांना पुरस्कार मिळाले ते नक्कीच त्यांच्या कामाची गती वाढवतील हे पुरस्कार म्हणजे आपल्या कामाला प्रेरणा देणारे असून त्याचा आदर्श इतरांनाही घ्यावा असे आव्हान आमदार ठाकूर यांनी काल
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई – रायगड जिल्हा यांच्या वतीने पनवेल तालुक्याचा प्रथम वर्धापन दिन अत्यंत उत्साही आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रविवार, दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात पुरस्कार आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४५ मान्यवर व्यक्तींना “रत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा म्हणजे समाजातील खऱ्या हिर्यांना ओळख देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती:
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून झी२४ तास चॅनेलच्या लोकप्रिय निवेदिका मनश्री पाठक, प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगीराव खोपकर, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक सिकंदर शेख, कानसा वारणा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकदादा पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभाग अध्यक्ष शैलेश पालकर, दैनिक नवभारत व नवराष्ट्रचे महाव्यवस्थापक सचिन पुलगावकर, अभिनेत्री विद्या ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आणि पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित होते.
कॅबिनेटमंत्री भरतशेठ गोगावले काही शासकीय कामांमुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात:
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व पूजनाने झाली. त्यानंतर प्रितमदादा म्हात्रे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
अॅड. कलावतीताई पाटील यांनी “आंदवनभुवनी” या समर्थ रामदासस्वामींच्या ओव्यांद्वारे मंत्रमुग्ध करणारे ईशस्तवन सादर केले.
विद्यार्थ्यांचे सादरीकरण:
या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांनाही विशेष महत्त्व देण्यात आले. रा.जि.प. शाळा वार्दोली आणि भाताण येथील विद्यार्थ्यांनी “आई भवानी तुझ्या कृपेने…” या गीतावर पारंपरिक कोळी लोकनृत्य सादर केले. जनता विद्यालय मोहोपाडा (इंग्रजी माध्यम) च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
गौरव आणि पुरस्कार वितरण:
झी२४ तास न्यूज चॅनेलच्या निवेदिका मनश्री पाठक, डॉ. गिरीश गुणे, चित्रपट दिग्दर्शक सिकंदर शेख, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पनवेलमधील गरीब रुग्णांसाठी अहोरात्र कार्य करणारे डॉ. गिरीश गुणे यांना विशेष सन्मान देण्यात आला. गेल्या दीड वर्षात वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांसाठी “स्मार्ट ग्रामपंचायत” पुरस्कार देण्यात आला.
आयोजकांचे योगदान:
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे आणि पनवेल तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष शैलेश चव्हाण, तालुका उपाध्यक्ष दीपक कांबळे, शहर अध्यक्ष असीम शेख तसेच रायगड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचे मोठे योगदान लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सांगितले की, “समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणारी अनेक मातब्बर मंडळी असतात, पण त्यांची ओळख समाजापर्यंत पोहोचत नाही. अशा व्यक्तींना या मंचाद्वारे समाजासमोर आणणे हाच आमचा उद्देश आहे.”

