पुन्य वार्ता
सांगली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने भव्य डिजिटल मीडिया अधिवेशनाचे आयोजन एस. बी. आय. कॉलेज, सांगली येथे करण्यात आले. या अधिवेशनाचे विशेष आकर्षण ठरले ते राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांचा करण्यात आलेला भव्य सत्कार!
मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा सन्मान खोबऱ्याचा हार, शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला व उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ. विश्वासराव आरोटे यांच्याकडून करण्यात आले तसेच या गौरव सोहळ्याचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी डिजिटल माध्यमांच्या वर्तमान व भविष्यकालीन वाटचालीवर भाष्य करत पत्रकारांच्या कार्याची प्रशंसा केली.
सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास राज्य सरचिटणीस व दैनिक ‘समर्थ गांवकरी’चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, निवड समिती अध्यक्ष रुपेश पाडमुख, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरटे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांना देखील शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, पत्रकार संघाचे प्रवक्ते रमेश डोंगरे, अहील्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, सांगली जिल्हाध्यक्ष प्रताप मिटकरी, श्रीनिवास शिंदे, संजय फुलसुंदर, बाबाजी वाघमारे, नांदेड जिल्हा अध्यक्ष मोहन पवार, सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वामी राज गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर, पत्रकार व संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डिजिटल युगातील पत्रकारितेचे महत्त्व:
अधिवेशनात डिजिटल मीडिया आव्हाने आणि संधी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डिजिटल पत्रकारितेची वाढती भूमिका, खोट्या बातम्यांचा प्रसार, सोशल मीडियातील जबाबदारी, तसेच नव्या पिढीतील पत्रकारांची दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली.
उपस्थित वक्त्यांनी सांगितले की, डिजिटल मीडियामुळे बातम्या झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचत आहेत, मात्र त्याचवेळी पत्रकारांनी सत्यतेची पडताळणी करूनच बातम्या सादर केल्या पाहिजेत. पत्रकार संघटनांनी यामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजीटल मिडिया विभागाच्या जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस पदांवर नवनियुक्ती!
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने डिजीटल मिडिया विभागासाठी विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस पदांवर नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. पत्रकार संघटनात्मक बळकटीसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून राज्यभरातील सर्वच प्रमुख जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त:
संभाजीनगर – जावेद पटेल
जालना – राहुल मुळे
लातूर – सुनिल कांबळे
परभणी – मोहम्मद सिद्दीकी
हिंगोली – उमेश चक्कर
नांदेड – सय्यद अब्दुल गफुर
जळगाव – आयाज मोहसीन
धुळे – सचिन पाटील
मुंबई – सुरेश पाटील
सातारा – अस्लम मुल्ला
अमरावती – सागर डोंगरे
सोलापूर – महेश गायकवाड (म्हाडा)
अकोला – संजय दास
ठाणे – अमित जाधव
अहिल्यानगर – श्रीकांत जाधव (उत्तर)
नंदुरबार – राजमल जैन
रायगड – अमोलकुमार जैन
रत्नागिरी – निसार शेख
पालघर – विकास पाटील
नाशिक – ज्ञानेश्वर तूपसुंदर
नागपूर – शरद नागदेवे, वैभव शहाणे
गडचिरोली – महेश गुंडेट्टीवार
भंडारा – मोहन राय
बुलढाणा – शौकत शहा
चंद्रपूर – राहुल थोरात
गोंदिया – रितेशकुमार अग्रवाल
धाराशिव – अहमेद शेख
सिंधुदुर्ग – समिल दळवी
वर्धा – राहुल मून
वाशिम – संजय खडसे
यवतमाळ – सचिन जिथे
सरचिटणीस पदी नियुक्त:
संभाजीनगर – सचिन गाडे
जालना – गणेश सातपुते
लातूर – आनंद दवणे
परभणी – राहुल धबाले
हिंगोली – राम घोडेकर
नांदेड – वैजनाथ सोनटक्के
जळगाव – चेतन निंबोळकर
धुळे – गणेश पाटील
मुंबई – विष्णू बुरे
सातारा – कैलास थोरवडे
अमरावती – मनीष गुढदे
सोलापूर – राजेश जगताप
अकोला – सम्राट गायकवाड
अहिल्यानगर – विनोद गायकवाड (दक्षिण)
नंदुरबार – नितीन सावळे
नाशिक – नितीन चव्हाण
नागपूर – अनिकेत उमरेडकर
गडचिरोली – श्रीधर दुगारापालटी
बुलढाणा – रवींद्र वाघ
चंद्रपूर – केवलसिंग जुनी
धाराशिव – एस. के. गायकवाड
सिंधुदुर्ग – कृष्णा सावंत
वर्धा – प्रशांत अवचट
वाशिम – संमय आंदुर्गे
या नियुक्त्या पत्रकार संघटनांना डिजीटल युगात अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करतील, असे विभागीय अध्यक्षांनी सांगितले. नवीन पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या कामकाजात यश मिळो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमाची सांगता उत्साहात:
या भव्य अधिवेशनाची सांगता जल्लोषात झाली. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी अतिशय उत्कृष्टरीत्या करण्यात आल्याबद्दल राज्य संघटक संजय भोकरे आणि त्यांच्या कार्यकारिणीचे सर्वत्र कौतुक झाले. उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
