पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनीधी)-
रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी व मो .वा. नी .धर्मराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन अकोले बस डेपो येथे दिनांक 29.1.2025 रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी 101 पेक्षा अधिक चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 84 चालकांना या नेत्र तपासणी मध्ये चष्मा लागलेले आहे. संबंधित चालकांना परिवहन विभागामार्फत मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे .यावेळी सचिन सानप (स.मो.वा.नी), हेमंत निकुंभ (स.मो.वा. नी), सुरेश दराडे (आगार व्यवस्थापक), सागर सांगळे (वाहतूक निरीक्षक अकोले बस डेपो), युसुफ पठाण (प्रतिनिधी), बाळासाहेब गंभिरे , अशोकराव फापाळे , अशोक कडलग, अजित छापेकर, प्रशांत भालेराव(प्रतिनीधी) आदी उपस्थित होते.
