पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
अहिल्यानगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष तथा अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या श्री.छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मेंहदूरी चे मुख्याध्यापक, राजेंद्र सोनवणे सर यांना
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य मुख्याध्यापक संघ, मुंबई यांच्या वतीने २०२५ चा
राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने दापोली, तालुका रत्नागरी,जि. रायगड या ठीकाणी सन्मानित करण्यात आले.या वेळी कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, अधिवेशन अध्यक्ष सुनील पंडित,माजी अध्यक्ष सुभाष माने,अरुण थोरात,विद्यमान अध्यक्ष तानाजी माने, सेक्रेटरी नंदकुमार सोनार आदी मुख्याध्यापक ,शिक्षक उपस्थित होते.
श्री राजेंद्र सोनवणे यांनी गेल्या वर्षांपासून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विविध माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदावर काम केले असून असून त्यांनी सरस्वती विद्यालय धामण8 पाट,श्री शेषणारायन विद्यालय,कुंभेफळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी(भंडारदरा),भैरवनाथ विद्यालय चास येथे मुख्याध्यापक काम केले असून सध्या ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय,मेहेंदुरी येथे कार्यरत आहे. त्यांनी आपल्या सेवा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले असून सर्व विद्यालयामध्ये भौतिक सुविधा निर्माण केल्या.त्यांचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांनी मुख्याध्यापक संघाचे १५ वर्षे तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडून मुख्याध्यापक यांना न्याय मिळवून दिला आहे. ते १५ वर्षे मुख्याध्यापक संघाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे आज ते मुख्याध्यापक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पद सांभाळीत आहे .
त्यांनी महाराष्ट्र राज्य निर्मळ ग्राम स्वच्छता अभियान व हागणदारी मुक्त गाव अभियान चितळवेढे, धामणगाव पाट,कुंभेफळ याठिकाणी भरीव काम केलेले आहे.
माजी गट शिक्षणाधिकारी मारुती लांघी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अकोले तालुका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था अकोले चे चेअरमन पद सांभाळलेले आहे. तसेच इंफोसिस कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातीलअनेक जि.प.प्रा.शाळांनाव माध्यमिक विद्यालयांना संगणक मिळवून दिले तसेच रोटरी क्लब सारख्या विविध सामाजिक संस्थाकडून,दानशूर व्यक्तीकडून कार्यरत असलेल्या विद्यालयांना मदत मिळविली.धामणगाव पाट विद्यालयासाठी इमारतीचे बांधकाम करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मा.आ.वैभवराव पिचड,कायम विश्वस्त गिरजाजी जाधव,विश्वस्त मधुकरराव सोनवणे,संपतराव वैद्य,सुरेशराव कोते,अध्यक्ष सुनील दातीर,सेक्रेटरी सुधाकर देशमुख,खजिनदार धनंजय संत,स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष रमेशराव जगताप, कार्यकारिणी सदस्य,शिक्षणाधिकारी संपत मालुंजकर,सर्व विभागाचे मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
