पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अकोले नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदी श्रीमती. धनश्री पवार यांनी शुक्रवार दि.२५ एप्रिल २०२५ रोजी कार्यभार स्वीकारला असून त्यांचे अकोले नगरपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यावेळी अकोले नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब वडजे, मा.उपनगराध्यक्ष श्री. शरद नवले , सन्मा सदस्य श्री. सागर चौधरी, सौ.शितल वैद्य, सौ. प्रतिभा मनकर , श्री. आरिफ शेख, श्री.नवनाथ शेटे, श्री. विजय पवार मा.सदस्य श्री. परशराम शेळके, श्री.नवनाथ मोहिते, श्री.मोहसीन शेख, श्री. प्रमोद मंडलिक,उबेद शेख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्रीमती. धनश्री पवार यांनी अकोले शहरात मोठ्या प्रमाणात काम करण्यास वाव असून स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नळ योजना राबविणे, प्लास्टिक बंदी तसेच विविध विकास कामांचे नियोजन करून ते मार्गी लावण्याचे ध्येय समोर ठेऊन काम करेल असे सर्व सन्मा सदस्य यांना आश्वस्त केले. मुख्याधिकारी पदावर रुजू होण्यापूर्वी श्रीमती. धनश्री पवार यांनी अकोला महानगरपालिका याठिकाणी सहा.आयुक्त पदी काम पाहिलेले आहे.
