पुन्य वार्ता
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील रहिवासी आणि विद्यार्थ्यांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱ्या, शिक्षिका कै .सौ. हिराबाई रामराव बढे (वय ६९ वर्षे) यांचे १९ एप्रिल रोजी निधन झाले.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांनी जनता विद्यालय, वडगाव पान, सह्याद्री विद्यालय, अंभोरे, संगमनेर खुर्द, तसेच साकुर येथील शाळांमध्ये शिक्षिका म्हणून कार्य केले. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती होती.
त्यांच्या पश्चात पती रामराव राधूजी बढे, मुलगा डॉ. उदयकुमार बढे (न्यूरोसर्जन), सून : डॉ. कावेरी उदयकुमार बढे (रेडियोलॉजिस्ट),
मुलगी उर्मिला रमेश घोटेकर (ग्रामविस्तार अधिकारी),
नातू कियांश उदयकुमार बढे
असा परिवार आहे.

