पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
अ. ता. ए.सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय शेंडी (भंडारदरा डॅम )आयोजित दि.25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस हा कार्यक्रम निवडणूक साक्षरता विभाग व तहसिल कार्यालय अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल मालूंजकर , महसूल सहाय्यक भाऊराव डगळे,मंडल अधिकारी ज्ञानेश्वर बांबळे, बारी गावचे तलाठी अविनाश रोंगटे, रा. से. यो अधिकारी संतोष तारगे व सहाय्यक अधिकारी प्रा.चंद्रकांत मंडलिक तसेच प्रा. पांडुरंग वाळुंज, प्रा त्रंबक बांडे, प्रा. धनगर आनंद प्रा. यशवंत शेळके, प्रा.सुनिल आवारी, प्रा. सोमनाथ गभाले, प्रा. अंकुश फोडसे, प्रा. भाऊराव भागडे,प्रा जगन धनगर,प्रा.सुप्रिया हासे, प्रा. धांडे, प्रा. भडांगे, अमित अवसरकर व योगेश मधे मनोहर भांगरे आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश्वर बांबळे यांनी मतदानाचे पावित्र्य राखण्याचे आवाहन केले. तर
प्राचार्य सुनील मालुंजकर यांनी राष्ट्रहितासाठी मतदानाची आवश्यकता किती आहे हे पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मंडलिक यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.वाळुंज यांनी केले. मान्यवरांचे स्वागत प्रतिमापूजन नंतर सत्कार व व्याख्याने होऊन 47 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.


