पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील परखतपूर येथील संतुजी गोपाळा वाकचौरे यांचे हृदयविकाराने निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय 75 होते होते. ते मुंबईमध्ये आयात निर्यात कंपनीमध्ये कार्यरत होते.
ते भाजपचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुशांत वाकचौरे, छत्रपती संभाजीनगर येथील ठेकेदार प्रशांत वाकचौरे व शैला धुमाळ, उज्वला धुमाळ यांचे वडील होते तसेच मनसेचे वाहतूक शाखेचे राज्य उपप्रमुख अनिल झोळेकर यांचे ते मेव्हणे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे परखतपूर येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अकोले चे नगरध्यक्ष बाळासाहेब वदजे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, भाजपा जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे पाटील, भाजपा चे रोहिदास धुमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, भास्कर खांडगे, भाजपा सरचिटणीस राहुल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय आभाळे, सरपंच प्रशांत वाकचौरे, राजेंद्र वाकचौरे, खंडु वाकचौरे, कवीराज भांगरे, अशो आदि उपस्थित होते.
