पुन्य वार्ता
सूरत: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आनंदराव आरोटे यांच्या हस्ते रमजान मंसुरी यांना गुजरात प्रदेश अध्यक्ष, दीपक इंगळे यांना गुजरात प्रदेश महामंत्री, मो. अकरम कुरैशी यांना गुजरात प्रदेश संघटन मंत्री, अजीज मंसुरी यांना दक्षिण गुजरात अध्यक्ष, रावसाहेब जाधव यांना सूरत जिल्हा अध्यक्ष, अनिल पाटील यांना सूरत जिल्हा संघटन मंत्री, तसेच ॲडव्होकेट दीप्ती जाधव यांना सूरत जिल्हा अध्यक्ष (महिला विंग) म्हणून सन्मानपूर्वक नियुक्त करण्यात आले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अनेक पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. यावेळी नियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यानंतर, संघटनेच्या पत्रकार बांधवांनी केंद्रीय जल संचार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेश अध्यक्ष तथा नवसारी लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. सी. आर. पाटील व श्री. छोटूभाई पाटील यांची भेट घेतली. त्यांना संघटनेच्या वतीने साईबाबांची मूर्ती भेट देण्यात आली. हा कार्यक्रम सूरत जिल्हा कार्यालयात पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये एम. एच. टाइम्सचे संपादक गणेश आवारी, सेवानिवृत्त उपअभियंता रामनाथ दशरथ आरोटे, तसेच सुप्रसिद्ध गायक आणि रेडिओ स्टार तुकाराम महाराज आरोटे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. संघटनेच्या नव्या नेतृत्वाला यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

