पुण्य वार्ता
अकोले: (प्रतिनिधी) जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही फक्त प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सर्व साध्य होते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व संपादक संदीप दराडे यांनी केले.ते वीरगाव येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेजच्या दहावी विदयार्थी निरोप समारंभात बोलत होते. अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे होते. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.अनिल रहाणे ,संचालिका सुप्रिया वाकचौरे, प्राचार्य किरण चौधरी प्रा.संदिप थोरात, अलका आहेर, अंजिरा देशमुख, पिंगलां तोरमल आदि व्यासपीठावर होते.
छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागा, आपली शाळा आपले आई-वडील या सर्वांना अभिमान वाटेल असे वागा. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका, असा सल्ला विद्यार्थ्यांना देत यशाचा गुरु मंत्र दिला. अनिल राहणे यांनी आपल्या मनोगतातून आपण आपल्या आयुष्यातील प्रवासाचा पहिला टप्पा पूर्ण केला असून आज पर्यंत मिळालेल्या ज्ञानाचा सदुपयोग करून जीवनात यशस्वी व्हा शाळा व आई वडिलांचे संस्कार विसरू नका असे सांगत दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी गायत्री सोनवणे, वैष्णवी नवले, संजना उंबरे ,सारा जहागीरदार ईश्वरी आभाळे, आकांक्षा संगारे या विद्यार्थ्यांनीनी तर अलका आहेर व प्रियंका सोनवणे या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक सुरेश बोंबले याने सूत्रसंचालन गौरव देशमुख व स्वराज उगले यांनी तर आभार प्रेम वाकचौरे याने मानले. यावेळी दहावी विषय शिक्षक रोहिणी नवले, मोनिका नेहे ,नफिसा शेख, रवींद्र वर्पे, कोमल भालेराव, रवींद्र चौधरी ,दत्तात्रय जगताप, देवीदास चारुडे, पांडुरंग खाडे,सोनाली तनपुरे ,कविता दातीर हे शिक्षक उपस्थित होते.

