पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी कु.काजल मच्छिंद्र शिंगवे इयत्ता सातवी हिने जिल्हा पातळीवर मुलींच्या मोठ्या गटात लांब उडीत प्रथम क्रमांक पटकाविल्याने अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.अभयकुमार वाव्हळ, शिक्षणविस्तारअधिकारी अनिल गायकवाड देवठाण बीट,गोरे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील घुले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, शिक्षकवृंद, तसेच ग्रामस्थ या सर्वांनी तिचे कौतुक केले आहे या विद्यार्थ्यांनीस शिक्षक सतीश कोटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

