पुण्य वार्ता
अकोले ( प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत तालुकास्तरीय शालेय क्रीडास्पर्धा दिनांक ४ते ६ सप्टेंबर या कालावधीत लिंगदेव येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात मुलांच्या संघाने प्रथम तर मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत मुलींच्या २९ संघांनी तर मुलांच्या ३१ संघांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वीरगाव मुलांच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा सपर्धे साठी पात्र ठरला आहे. तर मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
दोन्ही संघांचे आमच्या संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे ,संस्थेचे सचिव डॉ. अनिल राहणे विश्वस्त सुप्रिया वाकचौरे, गीता रहाणे,प्राचार्य किरण चौधरी , प्रा. संदीप थोरात, अधिक्षक रवींद्र आंबरे,यांनी अभिनंदन केले. तालुका खो- खो असोसीएशन ने देखील दोन्ही संघांचे भरभरून कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सुनिल शिंदे व विवेक शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.
क्रीडा मार्गदर्शक सुनिल शिंदे यांनी सर्व क्रीडा प्रेमी, मित्र परिवार, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व स्व. सोपानराव लांडे सर यांच्या परिवाराचे आभार मानले.


