पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- नागरकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केल्यास 70 टक्के अपघाताचे प्रमाण कमी होईल असे प्रतिपादन उप प्रादेशिक अधिकारी डी. वाय. पाटील यांनी केले. ते रस्ता सुरक्षा जन जागृती अभियांनातर्गत उप प्रादेशिक कार्यालय श्रीरामपूर,अकोले पोलीस ठाणे, अकोले आगार, तहसील विभाग व सर्व ड्रायव्हींग स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले शहरातून रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जन जागृती रॅली काढण्यात आली होती. सदर रॅली मध्ये युवकांनी हेल्मेट घालून सहभाग नोंदवला.या रॅलीला उप प्रादेशिक अधिकारी डी. वाय.पाटील, तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे यांनी हिरवा झेंडा दाखविला.सदर जन जागृती रॅली अकोले बसस्थानक ते अकोले महाविद्यालय पर्यंत काढण्यात आली होती.सदर रॅलीची सांगता अकोले महाविद्यालय येथे करण्यात आली यावेळी श्री पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर शेळके होते.यावेळी मोटर वाहन निरीक्षक डी.आर पाटील, सहायक मोटर वाहन निरीक्षक सचिन सानप, सहायक मोटर वाहन निरीक्षक हेमंत निकुंभ, सुळ साहेब, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे,अकोले आगार प्रमुख सुरेश दराडे, महामार्ग पो. कॉ. विठ्ठल शेरमाळे, पो. काँ. अजय आठरे, पो. कॉ. नितीन सांगळे, अकोले पोलिस स्टेशनचे हवालदार महेश आहेर, पो. कॉ. अविनाश गोडगे, पो. कॉ. सुहास गोरे, आर.एस. पी. चे जिल्हा समन्वयक सोमनाथ बोंतले,रोटरी क्लब चे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, प्रा.साहेबराव गायकवाड, प्रा.पांळदे,श्री विठ्ठल मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे हेमंत मोरे, प्रशांत भालेराव, युसुफ पठाण आदीसह नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डी. वाय. पाटील रस्ता सूरक्षेचे महत्त्व सांगताना म्हणाले की,मोटार सायकल चालविताना हेल्मेट वापरावे, चार चाकी वाहन चालविताना सीट बेल्ट लावावे,18 वर्षा खालील युवक युवतींनी वाहन चालवू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये, अपघात झाल्यास राष्ट्रीय हानी सह कुटुंब उद्धवस्त होते याची जाणीव सर्वांनी ठेवावी.रस्ता सुरक्षेच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन करीत नियमांचे पालन केल्यास 70 टक्के अपघाताचे प्रमाण कमी होईल.असे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ.भास्कर शेळके म्हणाले की, कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या घरातील पुरुषाने हेल्मेट घेतले की नाही हे पहिले विचारावे, लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवू नये,आपल्या जीवनाची किंमत होऊ शकत नाही, जीवन अनमोल असून ते एकदाच आहे.त्यामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे.असे मत व्यक्त केले.
यावेळी आर एस पी चे जिल्हा समन्वयक सोमनाथ बोन्तले,अकोले आगार प्रमुख सुरेश दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी श्री विठ्ठल ड्रायव्हिंग स्कुल चे प्राचार्य हेमंत मोरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा.पालंदे यांनी आभार मानले.

