पुण्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
डोंगरगाव येथील माजी शिक्षक भास्कर उगले यांचा नातू ईशान संदीप (नंदू) उगले याला , मध्यप्रदेश ग्वालेर येथे झालेल्या राष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियन शिप 2024 या स्पर्धेतील 11 वर्षाखालील वयोगटात कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.मागील वर्षी त्याचे प्रयत्न थोडक्यात हुकले.त्यावेळी त्याला सिल्वर पदकावर समाधान मानावेे लागले होते.परंतु या वर्षी त्याने शेवटी सुवर्णपदकाला गवसणी घातलीच.भारतातील सर्वाकृष्ट 36 शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी त्याला त्याची शाळा ध्रुव ग्लोबल स्कुल ने वेळोवेळी खूप सपोर्ट केला.या खेळाचे त्याचे मार्गदर्शक शिक्षक कुलदीप कगाडे, विनिता जोशी यांचे मार्गदर्शक लाभले.
ईशान च्या यशाबद्दल डोंगरगाव ग्रामस्थ व मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे..

