पुण्य वार्ता
अकोले/प्रतिनिधी –
येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अकोले या महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात व आनंदात साजरा करण्यात झाला. विद्यार्थिनींनी स्वागत गीतातून पाहुण्यांचे स्वागत केले. तर विद्यार्थ्यांनी काव्य वाचन व भाषणाच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरव केला.२७ फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भास्कर निर्मळ व दीपक पाचपुते होते. भास्कर निर्मळ यांनी आपल्या सुंदर अशा कवितांचे वाचन करून विद्यार्थ्यांना व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचे काम केले. दीपक पाचपुते यांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य चांगदेव डोंगरे हे होते. कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक विवेक वाकचौरे, प्रा. गुलाब देशमुख, डॉ. नितीन आरोटे व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचा परिचय, व स्वागत प्रा. सुनील साबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठी विषयाचे विषय शिक्षक प्रा.नंदा डफाळ व प्रा.दीपक वाकचौरे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनीषा गोडसे यांनी केले. तर आभार प्रा.रवींद्र गायकवाड यांनी मानले.
