पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी विधानसभा मतदारसंघ अकोले येथील शासकीय धान्य गोदाम (जुने) येथे स्थापन केलेल्या स्ट्रॉगरूमला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था,ईव्हीएम यंत्राचे वाटप व मत मोजणीच्या दिवशी जागेचे नियोजन याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली. प्रशासनाच्या सर्व विभागांच्या निवडणूकविषयक तयारीचा आढावा व कामकाजाची पाहणी करून निवडणूक आचारसंहितेच्यादृष्टीने त्यांनी सूचना दिल्या. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पोलिस प्रमुख ओला यांनी ईव्हीएम सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रॉगरूमचे ठिकाण व परिसराची पाहणी केली.
यावेळी अकोले विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे,पोलीस निरीक्षक श्री. मोहन बोरसे, गट विकास अधिकारी श्री. विकास चौरे, नगरपंचायत मुख्याधिकारी श्री. पंकज गोसावी,निवासी नायब तहसीलदार श्री. किसान लोहारे, महसूल नायब तहसीलदार श्री. प्रमोद सावंत व इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

अकोले : स्ट्रॉगरूमची पाहणी व विविध नियोजनाबाबत चर्चा करताना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ. समवेत जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे आदी.

